अजित पवार गटाला मोठा हादरा, नागालँडमधील 7 आमदारांनी सोडली साथ; सत्ताधारी पक्षात प्रवेश

अजित पवार गटाला मोठा हादरा, नागालँडमधील 7 आमदारांनी सोडली साथ; सत्ताधारी पक्षात प्रवेश

राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाला मोठा हादरा बसला आहे. नागालँडमधील सर्वच्या सर्व 7 आमदारांनी अजित पवार गटाला रामराम केला असून सत्ताधारी नॅशनल डोमोक्रॅटीक प्रोगेसिव्ह पार्टीत अर्थात डीपीपीमध्ये प्रवेश केला आहे. सात आमदारांनी पक्षप्रवेश केल्याने मुख्यमंत्री नेफ्यू रिओ यांच्या नेतृत्वाखाली एनडीपीपी पक्षाला विधानसभेमध्ये पूर्ण बहुमत मिळाले आहे. अजित पवार गटाच्या विलिनिकरणामुळे एनडीपीपीचे 60 सदस्यांच्या विधानसभेतील संख्याबळ 32 वर पोहोचले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर अजित पवार यांनी सत्तेची कास धरत वेगळा मार्ग निवडला आणि महायुती सरकारमध्ये सहभागी होत उपमुख्यमंत्रीपद मिळवले. फूटीमुळे राष्ट्रवादीचे अजित पवार आणि शरद पवार असे दोन गट झाले होते. त्यावेळी नागालँडमधील आमदारांनी अजित पवार गटासोबत राहण्याचा निर्णय घेतला होता.

2023 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत एनडीपीपीनंतर अजित पवार गट आणि मित्रपक्ष भारतीय जनता पक्षाने नागालँडमध्ये 12 जागा जिंकल्या होत्या. या निवडणुकीमध्ये अजित पवार गट हा राज्यातील तिसरा मोठा पक्ष म्हणून उदयास आला होता.

अजित पवार गट हा नागालँडमधील सर्वात मोठा विरोधी पक्षही होता. मात्र आता सर्व 7 आमदार फुटल्याने अजित पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. विशेष म्हणजे या सर्व आमदारांनी एनडीपीपीमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय विधानसभा अध्यक्षांकडे  लेखी स्वरुपात सादर केला असून घटनेच्या दहाव्या स्केड्यूलनुसार हे विलिनिकरण झाल्याचा दावा आमदारांनी केला आहे. तसेच हे विलिनीकरण घटनेच्या दहाव्या स्केड्यूलनुसार वैध आहे आणि 2019 च्या ‘आमदार अपात्रता नियमां’नुसार ते मंजूर करण्यात आले आहे, अशी माहिती विधानसभा अध्यक्षांनी दिली.

कोण आहेत फुटलेले आमदार?

दरम्यान, अजित पवार गटातून फुटलेल्यांमध्ये तेनिंग विधानसभा मतदारसंघाचे आमदार नामरी एन्चांग, अटोइझू विधानसभा मतदारसंघाचे आमदार पिक्टो शोहे, वोखा टाउन विधानसभा मतदारसंघाचे आमदार वाय. मोहोनबेमो हॅम्त्सो, मोन टाउन विधानसभा मतदारसंघाचे आमदार वाय. मानखाओ कोन्याक, लॉंगलेंग विधानसभा मतदारसंघाचे आमदार ए. पोंगशी फोम, नोकलाक विधानसभा मतदारसंघाचे आमदार पी. लाँगोन, आणि सुरुहोतो विधानसभा मतदारसंघाचे आमदार एस. तोइहो येप्थो यांचा समावेश आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;