पुण्यात सेतू कार्यालय बंद; दाखल्यांचे काम थंड

पुण्यात सेतू कार्यालय बंद; दाखल्यांचे काम थंड

विविध कारणांसाठी नागरिकांना लागणारे दाखले एकाच ठिकाणी प्राप्त व्हावेत, या उद्देशाने निगडीतील तहसील कार्यालयात सेतू केंद्र सुरू करण्यात आले. मात्र, तांत्रिक कारणामुळे तसेच पोर्टल अद्ययावतीकरणासाठी केंद्र 26 मे पासून बंद आहे. त्यामुळे शाळा, महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांना दाखले काढण्यासाठी मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. तसेच नागरिकांचे दाखल्यांचे काम रखडले आहे. दरम्यान, केंद्र चालविण्याचा संपलेला ठेका, वारंवार बदलणारे केंद्रचालक आणि नागरिकांच्या तक्ररींपुढे तहसीलदारदेखील हतबल झाल्याचे दिसून येत आहे.

सरकारी योजना, आवास योजना, वैद्यकीय सवलती आणि शिक्षणासाठी दाखले आवश्यक असतात. दाखले मिळविण्यासाठी नागरिकांची धावाधाव सुरू असते. गैरसो दूर करण्यासाठी शासनाकडून सेतू केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. जेणेकरून नागरिकांना एकाच ठिकाणी विविध दाखले उपलब्ध होऊ शकतील. निगडीतील सेतू केंद्रावर नागरिकांची दररोज गर्दी असते. मात्र, या केंद्राबाबत सातत्याने  सर्व्हर डाऊनची समस्या, वेळेत दाखले न मिळणे, ठाराविक कागदांसाठी संबंधितांकडून अडवणूक होत असल्याबाबत नागरिकांकडून तक्रारी केल्या जात होत्या. दरम्यान, येथील केंद्र यंत्रणा अद्ययावतीकरणासाठी 3 जूनपर्यंत बंद ठेवण्यात आल्याची सूचना येथे लावली आहे.

तहसीलदार जयराज देशमुख म्हणाले, शासनस्तरावर संकेतस्थळाच्या अद्ययावतीचे काम सुरू आहे. मात्र, दाखल्यांचे काम थांबले नाही. सध्या चालवत असलेल्या केंद्राने पुन्हा मुदतवाढ मागितली आहे. केंद्र लवकर सुरू करून लवकर दाखले वितरित करण्यात येतील.

शहरात नागरी सुविधांचा सुळसुळाट
शहरांमध्ये वेगवेगळे दाखले आणि प्रमाणपत्र काढण्यासाठी शहरात नागरी सुविधा केंद्रे सुरू झाली आहेत. शहराच्या विविध भागांत सद्यस्थितीत 200 च्या आसपास नागरी सुविधा केंद्रे आहेत. मात्र, याठिकाणी दाखल्यांसाठी जास्त प्रमाणात फी आकारली जात असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;