Maharashtra Corona Update : राज्यात कोरोनाचा धोका वाढला, आज एवढ्या रुग्णांची नोंद

Maharashtra Corona Update : राज्यात कोरोनाचा धोका वाढला, आज एवढ्या रुग्णांची नोंद

देशासह राज्यात पुन्हा एकदा कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होताना दिसत आहे,  गेल्या  आठवडाभरात देशातील सक्रिय कोरोना रुग्णांचा आकडा 3000 च्या वर पोहचला आहे. केरळमध्ये सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. आरोग्य मंत्रालयाकडून शनिवारी जारी करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार देशातील कोरोनाबाधितांची संख्या 3,395 वर पोहोचली आहे, यातील सर्वाधिक म्हणजे तब्बल 1336 रुग्णांची नोंद एकट्या केरळमध्ये झाली आहे. केरळमध्ये कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असून, कोरोना रुग्णांच्या संख्येमध्ये केरळ एक नंबरला, महाराष्ट्र दोन नंबरला तर दिल्लीचा तिसरा क्रमांक आहे. महाराष्ट्र आणि दिल्लीमध्ये देखील कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत.

महाराष्ट्रात काय स्थिती? 

महाराष्ट्रात देखील कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याचं चित्र आहे. आज राज्यात 65 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. यामध्ये पुण्यात 25, मुंबईमध्ये 22, ठाण्यात 9 तर पिंपरी चिंचवडमध्ये 6 कोरोनाच्या नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. राज्यातील कोरोना रुग्णांचा एकूण आकडा 506 वर पोहोचला आहे.

राज्यात 1 जानेवारी 2025 पासून ते आतापर्यंत एकूण 11501 एवढ्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये 814 जण  कोरोनाबाधित आढळून आले, त्यातील आता 300 पेक्षा अधिक रुग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. तर सध्या स्थितीमध्ये राज्यात एकूण 506 कोरोनाचे सक्रिय रुग्ण आहेत.

ठाण्यातही धोका वाढला 

दरम्यान ठाण्यात देखील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत आहे. आज ठाण्यामध्ये 9 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे आता हा आकडा 108 वर पोहोचला आहे, यापैकी 59 कोरोना रुग्णांचे पाच दिवसांचे गृह विलगीकरण पूर्ण झाले आहे. तर 16 जणांवर रुग्णालयात उपचार सुरू असून, त्यांची प्रकृती स्थिर आहे.  तर सध्या स्थितीमध्ये 32 जण गृह विलगीकरणात आहेत.

आरोग्य विभाग अलर्ट मोडवर

दरम्यान देशात वाढत असलेल्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभाग अलर्ट मोडमध्ये आला आहे. शुक्रवारी केंद्रीय आरोग्य आणि आयुष्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी केंद्र कोणत्याही परिस्थितीशी सामना करण्यासाठी सज्ज असल्याचे स्पष्ट केले. सरकार कोरोना परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे, असंही त्यांनी यावेळी म्हटलं.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

मुंबईला मुसळधार पाऊस झोडपणार, पुढील २४ तासांसाठी पावसाचा अलर्ट, समुद्रात लाटा उसळणार मुंबईला मुसळधार पाऊस झोडपणार, पुढील २४ तासांसाठी पावसाचा अलर्ट, समुद्रात लाटा उसळणार
Mumbai Weather: मुंबईसह राज्यात मे महिन्यात दमदार पाऊस झाला होता. त्यानंतर राज्यात मान्सूनची वेळेपूर्वीच एन्ट्री झाली होती. परंतु जून महिन्याच्या...
Mansoon Alert : पेरणीची नको घाई; 9 दिवस अंगाची लाही लाही, जूनमध्ये निघेल घामाटा, या तारेखापासून मान्सूनचा दिलासा
शिस्तभंगाच्या कारवाईबाबत राज्य सरकारचा महत्वपूर्ण बदला, आता नवीन पद्धतीचा करणार वापर
कॅन्सरग्रस्त दीपिकाची मोठी सर्जरी; पतीने हात जोडून प्रार्थनेची केली विनंती
‘निशा और उसके कजिन्स’ फेम अभिनेत्याचं कॅन्सरने निधन, शेवटची पोस्ट पाहून चाहते भावूक
जादा बांधकाम केल्यास जादा शुल्क आकारणार; बांधकाम परवानगी विभागाचा निर्णय
Jaggery Benefits- दररोज गूळ खाण्याचे 9 आरोग्य फायदे, वाचा सविस्तर