Ratnagiri News – दोन कोटींचे मनी लाँड्रिंग झाल्याचे सांगत 61 लाखांना गंडा, आरोपीला दिल्लीतून अटक

Ratnagiri News – दोन कोटींचे मनी लाँड्रिंग झाल्याचे सांगत 61 लाखांना गंडा, आरोपीला दिल्लीतून अटक

मिनिस्ट्री ऑफ कम्युनिकेशन मंत्रालयातून बोलतोय सांगून तुमच्या नावाने बॅंक खात्यातून दोन कोटी रूपयांचे मनी लाँड्रिंग झाले असल्याचे सांगत लाखांचा गंडा घातला. याप्रकरणी रत्नागिरी पोलिसांनी 61 लाख 19 हजार 80 रूपयांना गंडा घालणाऱ्या आरोपीला दिल्ली येथून अटक केली आहे. राजीव विश्वनाथ तिवारी असे अटक आरोपीचे नाव आहे. आरोपीला न्यायालयात हजर केले असता चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

आरोपीने फिर्यादीला फोन करून आपण मिनिस्ट्री ऑफ कम्युनिकेशन मंत्रालयातून बोलतोय सांगितले. यानंतर आपले सीम कार्ड बंद होत असून तक्रारीसाठी पोलिसांकडे फोन जोडत आहे असे सांगितले. दुसऱ्या व्यक्तीने पोलीस अधिकारी असल्याचे सांगून आपल्या नावाने कॅनरा बॅंकेत खाते उघडण्यात आले असून त्यामधून 2 कोटी रुपयांचे मनी लाँड्रिंग झाल्याचे सांगितले. फिर्यादीला 61 लाख 19 हजार 80 रूपये भरण्यास सांगून फसवणूक केली.

पोलिसांनी या गुन्ह्यांत झालेल्या आर्थिक व्यवहाराची बॅंकांकडून तपासणी केली. तपासात राजीव विश्वनाथ तिवारी हा आरोपी सध्या दिल्लीत असल्याचे निष्पन्न झाले. कोणतेही मोबाईल लोकेशन नसताना पोलिसांनी आरोपीला शिताफीने पकडले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;