Simhastha Kumbh Mela Nashik : नाशिक सिंहस्थ कुंभमेळाच्या पर्वणी जाहीर, जाणून घ्या अमृतस्नानाच्या तारखा

Simhastha Kumbh Mela Nashik : नाशिक सिंहस्थ कुंभमेळाच्या पर्वणी जाहीर, जाणून घ्या अमृतस्नानाच्या तारखा

नाशिक येथे 2026 मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पर्वणीची घोषणा करण्यात आली आहे. या महाकुंभमेळ्यात सुमारे मोठ्या संख्येने भाविक सहभागी होण्याची शक्यता आहे. या पर्वणीसाठी प्रशासनाने सर्वंकष तयारी सुरू केली असून, यावेळी कुंभमेळ्याचे आयोजन भव्य स्वरूपात होणार आहे.

नाशिक कुंभमेळा

  • सिंहस्थ ध्वजारोहण शुभारंभ – शनिवार 31 ऑक्टोबर 2026, दुपारी 12 वाजून 2 मिनिटांनी (स्थळ-रामकुंड पंचवटी)
  • प्रथम अमृतस्नान-सोमवार 2 ऑगस्ट 2027,आषाढ सोमवती अमावस्या.
  • महाकुंभस्नान/द्वितीय अमृतस्नान-मंगळवार 31 ऑगस्ट 2027, श्रावण अमावस्या
  • तृतीय अमृतस्नान-शनिवार 11 सप्टेंबर 2027, भाद्रपद शुद्ध एकादशी

त्र्यंबकेश्वर कुंभमेळा

  • सिंहस्थ ध्वजारोहण शुभारंभ- शनिवार 31 ऑक्टोबर 2026,
  • प्रथम अमृतस्नान-सोमवार 2 ऑगस्ट 2027, आषाढ सोमवती अमावस्या.
  • महाकुंभस्नान/द्वितीय अमृतस्नान-मंगळवार 31 ऑगस्ट 2027 , श्रावण अमावस्या
  • तृतीय अमृतस्नान-शनिवार 12 सप्टेंबर 2027, भाद्रपद शुद्ध द्वादशी (वामन द्वादशी).

याशिवाय नाशिक येथे सिंहस्थ पर्व पर्वकालातील सर्व एकादशी, पौर्णिमा, अमावस्या वैधृती व्यतिपात योग हे दिवस भाविकांसाठी तीर्थस्थान, दर्शन पर्व असतील. नाशिक येथे कुंभमेळा 2027 मध्ये मुख्य तीन पर्वण्याव्यतिरिक्त पर्वस्नानाचे एकूण 44 मुहूर्त असून त्र्यंबकेश्वर येथे पर्वस्नानाचे एकूण 53 मुहूर्त आहेत. भाविकांनी अमृत स्नानाशिवाय पर्वस्नानाचा दिवशी देखील मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी केले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;