Ukraine Drone Attack – रशियाच्या दोन एअरबेसवर युक्रेनचा ड्रोन हल्ला, 40 विमाने नष्ट केल्याचा दावा

Ukraine Drone Attack – रशियाच्या दोन एअरबेसवर युक्रेनचा ड्रोन हल्ला, 40 विमाने नष्ट केल्याचा दावा

युक्रेनने रशियाच्या दोन महत्त्वाच्या हवाई तळांवर रविवारी ड्रोन हल्ला केला. युक्रेनियन सैन्याने रशियावर केलेला आतापर्यंतचा हा सर्वात मोठा हल्ला आहे. या हल्ल्यात 40 हून अधिक रशियन बॉम्बर जेट्सचे नुकसान झाले आहे. ओलेन्या आणि बेलाया दोन एअरबेसवर हा हल्ला करण्यात आला.

मिळालेल्या माहितीनुसार, युक्रेनने केलेल्या मोठ्या ड्रोन हल्ल्यानंतर, ओलेन्या एअरबेसवर अनेक रशियन स्ट्रॅटेजिक बॉम्बर्सना आग लागली आहे. युक्रेनचे ड्रोन रशियन हद्दीत दूरवर जाण्यात आणि Tu-95, Tu-22 तसेच महागड्या आणि दुर्मिळ A-50 विमानांना नुकसान पोहोचवण्यात यशस्वी झाल्याचे युक्रेन सुरक्षा सेवा (एसबीयू)च्या अधिकाऱ्याने सांगितले. ही विमाने रशियासाठी खूप महत्त्वाची आहेत.

रशियातील इर्कुत्स्कच्या दुर्गम भागात असलेल्या “बेलाया” हवाई तळावर हा हल्ला झाला असून “ओलेन्या” हवाई तळावरही आग लागल्याचे एसबीयूने म्हटले आहे. मात्र अद्याप याची अधिकृत पुष्टी झालेली नाही.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;