ट्रम्प यांचे रुसवे-फुगवे; एलॉन मस्क यांच्या निकटवर्तीयाला नासा प्रमुखपदावरून हटवले

ट्रम्प यांचे रुसवे-फुगवे; एलॉन मस्क यांच्या निकटवर्तीयाला नासा प्रमुखपदावरून हटवले

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि ऐलॉन मस्क यांच्यात सध्या दुरावा निर्माण झाल्याचे दिसत आहे. दोघांमधील नाराजीचे वृत्त चर्चेचा विषय ठरले होते. आता ट्रम्प यांचे रुसवे- फुगवे आणि नाराजी अद्याप कायम असल्याचे दिसून येत आहे. ट्रम्प यांनी मोठा निर्णय घेत नासाच्या प्रमुखपदी असलेल्या टेक अब्जाधीश जेरेड इसाकमन यांना पदावरून हटवले आहे. इसाकमन हे ऐलॉन मस्क यांचे निकटवर्तीय मानले जातात. ट्रम्प आणि मस्क यांच्यातील नाराजीचा फटका इसाकमन यांना बसल्याची चर्चा होत आहे.

व्हाईट हाऊसने शनिवारी घोषणा केली की राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प लवकरच नासाच्या नेतृत्वासाठी नवीन उमेदवाराची घोषणा करतील, टेक अब्जाधीश जेरेड इसाकमन आता या पदासाठी विचाराधीन नाहीत याची पुष्टी केली. मात्र, बदलाबाबत कोणतेही अधिकृत कारण देण्यात आलेले नाही. पण हे पाऊल सिनेटमध्ये इसाकमन यांच्या पुष्टीकरणावर मतदान होण्यापूर्वीच उचलण्यात आले आहे. ट्रम्प आणि मस्क यांच्यातील नाराजीमुळे हा निर्णय घेण्यात आल्याची चर्चा होत आहे.

व्हाईट हाऊसच्या प्रवक्त्या लिझ ह्यूस्टन यांनी म्हटले आहे की, नासाचा पुढचा प्रमुख राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या अमेरिका फर्स्ट धोरणाशी पूर्णपणे सुसंगत असणे आवश्यक आहे आणि राष्ट्राध्यक्ष ट्रम्प लवकरच नवीन उमेदवाराची घोषणा करतील. इसाकमन यांना डिसेंबरमध्ये राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी नासाच्या प्रमुखपदी नामांकित केले होते. खाजगी क्षेत्रातील पार्श्वभूमीमुळे त्यांच्या नियुक्तीने अंतराळ समुदायातील अनेकांना आश्चर्य वाटले.

ट्रम्प यांनी सोशल मीडियावर जेरेडचे नामांकन मागे घेण्याची घोषणा करणारी पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये त्यांनी लिहिले आहे की, ‘मागील चौकशीनंतर, मी नासाचे प्रमुख म्हणून जेरेड इसाकमन यांचे नामांकन मागे घेत आहे. मी लवकरच एका नवीन उमेदवाराची घोषणा करेन जो या मोहिमेशी संबंधित असेल आणि अंतराळात अमेरिकेला प्राधान्य देईल, असे त्यांनी म्हटले आहे.

इसाकमन यांना नामांकन रद्द करण्यात आल्याने मस्क निराश झाले आहेत आणि हा निर्णय राजकीयदृष्ट्या प्रेरित असल्याचे त्यांनी सांगितले. एवढा सक्षम आणि चांगल्या मनाचा माणूस मिळणे दुर्मिळ आहे, अशी प्रतिक्रिया मस्क यांनी दिली आहे. राष्ट्रपती ट्रम्प लवकरच नवीन नामांकन जाहीर करण्याची अपेक्षा आहे, ज्याचा नासाच्या भविष्यातील नेतृत्वावर आणि त्याच्या धोरणात्मक दिशेवर व्यापक परिणाम होईल.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

11 वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया नोंदणीच्या मुदतीत वाढ, आता या तारखेपर्यंत नोंदणी करता येणार 11 वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया नोंदणीच्या मुदतीत वाढ, आता या तारखेपर्यंत नोंदणी करता येणार
दहावीच्या निकालानंतर विद्यार्थ्यांना कॉलेजात जायचे वेध लागले आहेत. त्यासाठी कॉलेज निवडण्याची प्रक्रिया सुरु आहे. आधी इयत्ता 11 वी ऑनलाईन प्रवेश...
अक्षय कुमारने ‘या’ कारणामुळे चाहत्यांसमोर जोडले हात, हाऊसफुल 5 च्या प्रमोशनचा व्हिडिओ व्हायरल
NEET PG 2025 – नीट पीजी परीक्षा पुढे ढककली, सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानंतर एनबीईएमएसचा निर्णय
हिंदुस्थानने दोन हजार बांगलादेशी घुसखोरांना परत पाठवले, BSF ची मोठी कारवाई
मोठी बातमी! आशिया चषक अनिश्चित काळासाठी स्थगित, कारणही आलं समोर; वाचा…
Pune News: सराफी पेढीतून तब्बल साडेचार कोटींच्या दागिन्यांची चोरी, विश्रामबाग पोलिसांकडून कर्मचाऱ्याविरुद्ध गुन्हा
आम्ही इथले भाई, रामटेकडीत टोळक्याचा राडा, हवेत शस्त्रास्त्रे फिरवित केली दगडफेक