दोन्ही गटांत नायशा भातोयेला अव्वल मानांकन
मुंबई शहरची युवा आणि प्रतिभावान खेळाडू नायशा कौर-भातोये ला सीसीआय-जीएमबीए जिल्हा बॅडमिंटन स्पर्धेमध्ये महिला आणि 19 वर्षांखालील मुली एकेरी या दोन्ही गटात अव्वल मानांकन देण्यात आले आहे. सीसीआय आयोजित या स्पर्धेला 2 जून 2025 पासून बॅडमिंटन कोर्टवर प्रारंभ होईल.
महिला एकेरीत शिवानी हेर्लेकरला दुसरे मानांकन मिळाले आहे. पुरुषांच्या एकेरीत अजय मीना याला टॉप सीडिंग आहे. अव्वल चार मानांकित खेळाडूंमध्ये हर्षित माहिमकर, पियुष कांबळे आणि ऋतुराज राठोडचा समावेश आहे. 17 आणि 19 वर्षांखालील मुले एकेरी गटामध्येही हर्षितला अव्वल मानांकन देण्यात आले आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List