Jalna News – धुळे सोलापूर महामार्गावर इनोव्हा गाडीला अपघात, एक जागीच ठार; एक गंभीर जखमी

Jalna News – धुळे सोलापूर महामार्गावर इनोव्हा गाडीला अपघात, एक जागीच ठार; एक गंभीर जखमी

भरधाव वेगात शिर्डीकडे जाणाऱ्या इनोव्हा कारचालकाला डुलकी लागल्याने कार दुभाजक ओलांडून रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला जाऊन ट्रकला धडकली. या अपघातात एक जण ठार तर एक जण किरकोळ जखमी झाला आहे. जालन्यातील अंबड तालुक्यातील धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्ग 52 वरील सौंदलगाव पाटीजवळ रविवारी सकाळी साडेसात वाजता ही घटना घडली.

इनोव्हा कार छत्रपती संभाजीनगरहून हैदराबादकडे जात असताना डिव्हाइडर ओलांडून दुसऱ्या लेनवर गेली. यावेळी बीडकडून संभाजीनगरकडे जाणारा कंटेनर इनोव्हा कारला धडकला. यात कारमधील रमेश कृष्णमूर्ती हे जागीच ठार झाले. तर चालक श्रीराम भास्कर धिता जखमी आहे. अपघातानंतर कंटेनर चालक पळून गेला.

एन.एच.आय टिमचे मारुती चित्रे, अभिषेक सिरसकर, संजय यरमळ, रुग्णवाहिकाचे डॉ. महेश जाधव, चालक आत्माराम गाडेकर, मदतनीस विठ्ठल गायकवाड यांनी क्रेनच्या साह्याने बाजूला करत वाहतूक सुरळीत केली. जखमीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. कृष्णमूर्ती यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी वडीग्रोद्री प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आला. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;