प्रियकराने लॉटरीत जिंकले 30 कोटी, सर्व पैसे घेऊन प्रेयसी दुसऱ्या बॉयफ्रेंडसोबत फरार

प्रियकराने लॉटरीत जिंकले 30 कोटी, सर्व पैसे घेऊन प्रेयसी दुसऱ्या बॉयफ्रेंडसोबत फरार

पैसा भल्याभल्यांना भुरळ पाडतो आणि पैशांच्या मोहापाई अनेक नाती उद्ध्वस्त होतात. अशा अनेक घटना तुमच्या पाहण्यात किंवा वाचण्यात आल्या असतील. असाच काहीसा प्रकार एका प्रियकरासोबत घडला आहे. लॉटरीमध्ये जिंकलेले 30 कोटी घेऊन प्रेयसी फरार झाल्याची तक्रार पोलीस स्थानकात दाखल झाली आहे. कोर्टापर्यंत हे प्रकरण गेलं असून प्रियकराला या सर्व प्रकारामुळे चांगलाच मनस्ताप झाला आहे.

कॅनडातील लॉरेन्स कँपेम्बलने 2024 साली लॉटरीचं तिकीट खरेदी केलं होतं. नंतर त्याने ते 30 कोटी रुपये जिंकले. परंतु वैध ओळखपत्र नसल्यामुळे, त्याला रक्कम काढता येत नव्हती. त्यामुळे त्याला लॉटरी अधिकाऱ्यांनी दुसऱ्याच्या नावाने पैसे काढण्याचा सल्ला दिला होता. त्यामुळे त्याने प्रेयसी क्रिस्टल अँन मॅकेवर विश्वास दाखवला आणि तिच्या नावाने पैसे काढले. बँकेत खातं नसल्यामुळे त्याने सर्व रक्कम क्रिस्टलच्या खात्यावर जमा केली होती. त्यानंतर काही दिवस दोघेही खूश होते. परंतु त्यानंतर अचानक क्रिस्टलने लॉरेन्सशी संबंध तोडला. त्याला सोशल मीडियासह सर्व ठिकाणाहून ब्लॉक केलं. त्यानंतर लॉरेन्सने शोधाशोध केली असता क्रिस्टल दुसऱ्या व्यक्तिसोबत आनंदात दिवस घालवत असल्याची त्याला माहिती मिळाली. त्यानंतर त्याने क्रिस्टलविरुद्ध गुन्हा दाखल केला. त्याचबरोबर चुकीचा सल्ला दिला म्हणून वेस्टर्स कॅनडा लॉटरी कॉर्पोरेशन आणि मॅनिटोबा लिकर अँड लॉटरी यांच्याविरोधातही गुन्हा दाखल केला. आज तकने यासंदर्भात वृत्त दिले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;