गाझामधील मदत केंद्रावर इस्रायली सैन्याने केला गोळीबार, 30 जणांचा मृत्यू; 115 हून अधिक जखमी

गाझामधील मदत केंद्रावर इस्रायली सैन्याने केला गोळीबार, 30 जणांचा मृत्यू; 115 हून अधिक जखमी

दक्षिण गाझा पट्टीतील राफा येथे गाझा ह्युमॅनिटेरियन फाऊंडेशनद्वारे (GHF) चालवल्या जाणाऱ्या मदत वितरण केंद्राजवळ इझरायली सैन्याने केलेल्या गोळीबारात किमान 30 पॅलेस्टिनी नागरिकांचा मृत्यू झाला आहे, तर 115 हून अधिक जण जखमी झाले आहेत. ही घटना रविवारीसकाळी घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, राफा येथील तेल अल-सुलतान परिसरात असलेल्या या मदत केंद्रावर हजारो पॅलेस्टिनी नागरिक अन्न आणि इतर जीवनावश्यक वस्तूंसाठी जमले होते. स्थानिक पत्रकार मोहम्मद घरीब यांनी बीबीसीला सांगितले की, अमेरिकेच्या पाठिंब्याने चालणाऱ्या या केंद्राकडे जाण्यासाठी लोक मोठ्या संख्येने जमले असताना इझरायली टँकने गर्दीवर गोळीबार केला. या घटनेत जखमी झालेल्यांना राफा जवळील नासिर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

दरम्यान, हमासने या हल्ल्याचा निषेध करत इझरायली सैन्यावर भुकेल्या नागरिकांवर नरसंहार केल्याचा आरोप केला आहे. हमासशी संबंधित माध्यमांनीही हा हल्ला अत्यंत क्रूर असल्याचे म्हटले आहे. दुसरीकडे इझरायल डिफेन्स फोर्सेसने (IDF) या गोळीबारात कोणतीही जखम किंवा मृत्यू झाल्याची माहिती नसल्याचे सांगितले असून, ही बाब तपासली जात असल्याचे सांगितले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;