MI Vs PBKS – युजवेंद्र चहल मुंबईविरुद्ध खेळणार का नाही? मोठी अपडेट आली समोर, वाचा…

MI Vs PBKS – युजवेंद्र चहल मुंबईविरुद्ध खेळणार का नाही? मोठी अपडेट आली समोर, वाचा…

IPL 2025 चा दुसरा क्वालिफायर सामना मुंबई इंडियन्सविरुद्ध पंजाब किंग्ज यांच्यात अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर आज (1 जून 2025) खेळला जाणार आहे. संध्याकाळी 7.30 वाजता फायनलमध्ये धडक मारण्यासाठीचा थरार सुरू होईल. जिंकणारा संघ फायनलमध्ये आणि हरणारा संघ थेट घरी जाईल. त्यामुळे दोन्ही संघांच्या चाहत्यांच्या नजरा सामन्यावर स्थिरावल्या आहेत. अशातच पंजाब किंग्जचा हुकूमी एक्का म्हणजेच युजवेंद्र चहलच्या खेळण्यावर अजूनही प्रश्नचिन्ह कायम आहे.

युजवेंद्र चहल सध्या चांगल्या फॉर्मात आहे. त्यामुळे त्याचं संघात असण पंजाबसाठी फायद्याचं ठरणार आहे. परंतु दुखापतीमुळे मागील तीन सामन्यांमध्ये तो खेळू शकलेला नाही. त्याने 18 मे रोजी राजस्थानविरुद्ध शेवटचा सामना खेळला होता. त्यानंतर दुखापतीमुळे तो स्पर्धेत खेळताना दिसला नाही. मुंबईविरुद्ध होणारा सामना पंजाबसाठी ‘करो या मरो’चा आहे. त्यामुळे संघ कोणत्याही परिस्थितीमध्ये सामना जिंकण्यासाठी प्रयत्नशील असेल. अशा परिस्थीतीत युजवेंद्र चहलच संघात असणं इतर गोलंदाजांना स्फुर्ती देणारं ठरू शकतं. चहलला सुद्धा मुंबईविरुद्धच्या सामन्यात खेळायचं आहे.

फक्त प्रेम…! गिल आणि पंड्याने शेअर केली खास पोस्ट, एलिमिनेटर लढतीवेळी वाद झाल्याची होती चर्चा

मुंबईविरुद्ध खेळण्यासाठी चहल इंजेक्शन घेण्यासही तयार असल्याचे वृत्त आहे. त्याचबरोबर तो नेट्समध्ये सराव करतानाही दिसला आहे. तसेच क्षेत्ररक्षणाच्या सरावातही त्याने भाग घेतला आहे. त्यामुळे मुंबईविरुद्ध चहल ‘इम्पॅक्ट प्लेअर’ म्हणून मैदानात उतरण्याची दाट शक्यता आहे. टाईम्स ऑफ इंडियाने या संदर्भात वृत्त दिले आहे. चहलने IPL 2025 मध्ये 12 सामने खेळले असून 25.28 च्या सरासरीने 14 विकेट घेतल्या असून यामध्ये एका हॅट्रीकचा सुद्धा समावेश आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;