नेपाळमध्ये हजारो लोक उतरले रस्त्यावर; काठमांडूत हिंदू राष्ट्र आणि राजशाही पुनर्स्थापनेसाठी आंदोलन

नेपाळमध्ये हजारो लोक उतरले रस्त्यावर; काठमांडूत हिंदू राष्ट्र आणि राजशाही पुनर्स्थापनेसाठी आंदोलन

नेपालला हिंदू राष्ट्र घोषित करण्याची आणि राजशाही पुनर्स्थापित करण्याची मागणी जोर धरत आहे. यातच राष्ट्रीय प्रजातंत्र पक्ष (आरपीपी) आणि आरपीपी-नेपाल यांसह राजशाही समर्थक गटांनी काठमांडू येथील नारायण चौर परिसरात तीव्र आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनादरम्यान प्रतिबंधित क्षेत्रात प्रवेश करण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी नेपालचे माजी गृहमंत्री कमल थापा यांच्यासह सुमारे सहा जणांना अटक केली आहे. आंदोलनकर्त्यांनी जोपर्यंत राजशाही पुनर्स्थापित होत नाही, तोपर्यंत आपले आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

राष्ट्रीय प्रजातंत्र पार्टीच्या नेतृत्वाखाली काठमांडूत झालेल्या या निदर्शनांमध्ये हजारो समर्थकांनी सहभाग घेतला. आंदोलनकर्त्यांनी माजी राजा ज्ञानेंद्र शाह यांच्या फोटोचे बॅनर हातात धरले होते. नारायण चौर येथील या आंदोलनादरम्यान पोलीस आणि आंदोलकांमध्ये काही ठिकाणी तणावाची परिस्थिती निर्माण झाले होती.

याबाबत माहिती देताना काठमांडू व्हॅली पोलिसांचे प्रवक्ते अपिल बोहोरा म्हणाले की, राजेशाहीचे कट्टर समर्थक आणि आरपीपीचे अध्यक्ष राजेंद्र लिंगदेन हे आंदोलनाचे नेतृत्व करत होते. आंदोलकांनी सुरक्षा घेरा तोडून पंतप्रधानांचे अधिकृत निवासस्थान असलेल्या बालुवातारकडे जाण्याचा प्रयत्न केला. यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;