पाऊस आणि भुस्खलनामुळे ईशान्येकडील राज्यात हाहाःकार, हजारो नागरिक विस्थापित
पाऊस आणि भुस्खलनामुळे ईशान्येकडील राज्यांची दैना उडाली आहे. या राज्यांत पावसामुळे आतापर्यंत 14 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 78 हजार लोक विस्थापित झाले आहेत. अरुणाचल प्रदेश, आसाम आणि मिझोरमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मिझोरमध्ये झालेल्या भुस्खलनात एक हॉटेल कोसळलं आहे. या हॉटेलमध्ये म्यानमारचे लोक थांबले आहेत. यात म्यानमारच्या तीन जणांचा मृत्यू झाला आहे. दुसरीकडे तिस्ता नदीच्या पाण्याची पातळी वाढली आहे.
हिंदुस्थानी सैन्याने आसाम रायफल्सने आतापर्यंत 800 जणांना या पुरातून वाचवलं आहे. इम्फाळ पूर्व आणि पश्चिम भागातील 408 जणांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले आहे.
अरुणाचल प्रदेशमध्ये भुस्खलनमुळे सात जणांचा मृत्यू झाला आहे. शुक्रवारी राष्ट्रीय महामहार्ग 13 वर भुस्खलनामुळे एक गाडी दरीत कोसळली आणि त्यातील दोन कुटुंबातील सात जणांचा मृत्यू झाला. तर दुसरीकडे लोअर सुबनसिरी जिल्ह्यात भुस्खलनामुळे शेतात काम करणाऱ्या दोन मजुरांचा दबून मृत्यू झाला आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List