93 च्या बॉम्बस्फोटातील आरोपीला गुजरातमधून मुंबईत आणणार; खटल्याला गती मिळणार

93 च्या बॉम्बस्फोटातील आरोपीला गुजरातमधून मुंबईत आणणार; खटल्याला गती मिळणार

1993 मध्ये मुंबईवर झालेल्या बॉम्बस्फोटातील आरोपी मुनाफ अब्दुल हलारी याला मुंबई सत्र न्यायालयातील विशेष टाडा न्यायालयात हजेरी लावावी लागणार आहे. हलारीला गुजरातच्या साबरमती मध्यवर्ती कारागृहातून मुंबईच्या आर्थर रोड कारागृहात स्थलांतरित करण्याचे आदेश विशेष टाडा न्यायालयाने दिले आहेत. हलारीला मुंबईला हलवण्याची मागणी सीबीआयने केली होती. टाडा न्यायालयाने ही मागणी मान्य केल्यामुळे 93 च्या मुंबई बॉम्बस्फोट खटल्याच्या सुनावणीला गती मिळण्याची चिन्हे आहेत.

हलारी सध्या साबरमती कारागृहात कैद असून त्याला तेथून व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून मुंबई न्यायालयातील सुनावणीला हजर केले जाते. मात्र यादरम्यान तांत्रिक अडचण येत असल्याने हलारीला आर्थर रोड कारागृहात हलवण्यात यावे, अशी मागणी करीत सीबीआयने विशेष टाडा न्यायालयात अर्ज केला होता. त्यावर हलारीच्या वकिलांनी तीव्र आक्षेप घेतला होता. विशेष टाडा न्यायाधीश व्ही. डी. केदार यांनी दोन्हीकडील युक्तीवाद सविस्तरपणे ऐकून घेतल्यानंतर सीबीआयची मागणी मान्य केली.

विशेष टाडा न्यायालयाने मुंबई बॉम्बस्फोट खटल्यात साक्षी-पुरावे नोंदवून घेण्यासाठी हलारीच्या प्रत्यक्ष हजेरीचे आदेश दिले. साबरमती कारागृहाच्या अधिक्षकांना हे आदेश दिले आहेत.

मुंबईत 12 मार्च 1993 रोजी बॉम्बस्फोट घडवण्यात आले होते. त्यात 257 निरापराधी लोकांना प्राण गमवावा लागला होता, तर 700 हून अधिक लोक जखमी झाले होते. या बॉम्बस्फोटाच्या कटात सहभागी झाल्याप्रकरणी हलारीला 29 फेब्रुवारी 2020 रोजी अटक करण्यात आली होती. सध्या हलारी साबरमती कारागृहात आहे, तर इतर 6 आरोपी मुंबईतील आर्थर रोड कारागृहात आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Mumbai News – जुना वाद टोकाला गेला, दोन कुटुंबांचा एकमेकांवर कोयत्याने हल्ला; तिघांचा मृत्यू Mumbai News – जुना वाद टोकाला गेला, दोन कुटुंबांचा एकमेकांवर कोयत्याने हल्ला; तिघांचा मृत्यू
जुन्या वादातून दोन कुटुंबांनी एकमेकांवर चाकू आणि कोयत्याने हल्ला केल्याची खळबळजनक घटना मुंबईतील दहिसर परिसरात घडली. या हल्ल्यात तिघांचा मृत्यू...
अजितदादांचे एक दगडात दोन पक्षी, टाकला मोठा डाव, राजकारणातून मोठी बातमी
‘कजरा रे’ गाण्यावर ऐश्वर्या राय अभिषेकसह लेक आराध्याही थिरकली; लग्नातला तो व्हिडिओ व्हायरल
7 वर्षे रिलेशन, अन् लग्न…मुंबईच्या ‘या’ अभिनेत्रीची खास लव्ह स्टोरी माहिती आहे का?
IPL 2025 – अगदी थाटात! सुदर्शन आणि गिलचा विध्वंस, दिल्लीचा धुव्वा उडवत गुजरातली प्लेऑफमध्ये एन्ट्री
ज्योती मल्होत्रानंतर आणखी एका पाकिस्तानी गुप्तहेराला अटक, ISI ला पाठवत होता गोपनीय माहिती
Gadchiroli News – यू टर्न घेताना ट्रकची कारला धडक, अपघातात तिघांचा मृत्यू; एक गंभीर जखमी