Mumbai News – जुना वाद टोकाला गेला, दोन कुटुंबांचा एकमेकांवर कोयत्याने हल्ला; तिघांचा मृत्यू

Mumbai News – जुना वाद टोकाला गेला, दोन कुटुंबांचा एकमेकांवर कोयत्याने हल्ला; तिघांचा मृत्यू

जुन्या वादातून दोन कुटुंबांनी एकमेकांवर चाकू आणि कोयत्याने हल्ला केल्याची खळबळजनक घटना मुंबईतील दहिसर परिसरात घडली. या हल्ल्यात तिघांचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी एमएचबी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.

दहिसरमधील गणपत पाटील नगरमध्ये राहणाऱ्या शेख आणि गुप्ता कुटुंबामध्ये 2022 पासून वाद होते. दोन्ही कुटुंबांनी एकमेकांविरोधात गुन्हे दाखल केले होते. तेव्हापासून दोन्ही कुटुंबात वैमनस्य होते. रविवारी राम गुप्ता याच्या नारळ विक्री स्टॉलसमोर शेख दारु पिऊन आल्यानंतर त्यांच्यात वाद झाला. यानंतर दोघांनी आपापल्या मुलांना बोलावले.

दोन्ही कुटुंबाने एकमेकांवर धारदार शस्त्राने वार केले. यात राम गुप्ता, अरविंद गुप्ता आणि हमीद शेख यांचा मृत्यू झाला. तर अमर गुप्ता, अमित गुप्ता, अरमान शेख आणि हसन शेख हे जखमी झाले. तिन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी शताब्दी रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. दोन्ही गटावर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी जखमी असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असल्याने अद्याप अटक करण्यात आली नाही.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

शववाहिका खरेदीत 35 कोटींचा भ्रष्टाचार, बाजारभावापेक्षा अधिक दराने खरेदी शववाहिका खरेदीत 35 कोटींचा भ्रष्टाचार, बाजारभावापेक्षा अधिक दराने खरेदी
तब्बल 100 शववाहिकांच्या खरेदीत 35 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाला आहे. या शववाहिकांच्या खरेदीसाठी मागवण्यात आलेल्या निविदा प्रक्रियेत नियमांचे उल्लंघन झाले...
म्हाडाच्या जनता दरबारात रहिवाशांच्या तक्रारींचे निवारण
ना संसद, ना न्यायपालिका, देशात संविधानच सर्वोच्च! सरन्यायाधीश भूषण गवई यांनी ठणकावले
कोरोनाचे पुन्हा आक्रमण, केईएममध्ये दोन रुग्णांचा मृत्यू
मुंबईच्या तलावांत 18 टक्केच पाणीसाठा, प्रचंड उकाड्यामुळे धरणांनी तळ गाठला
आजपासून अकरावीचे अ‍ॅडमिशन, मुंबईत प्रवेशांवर एसएससीच्या विद्यार्थ्यांचा वरचष्मा, सायन्ससाठी चुरस कमी
जिथून गोळी आली ती प्रत्येक पाकिस्तानी चौकी उद्ध्वस्त, ‘ऑपरेशन सिंदूर’चा नवा व्हिडीओ