तुरुंगात असताना दहशतवादी जकीउर रहमान लखवी झाला बाप, ओवैसींनी पाकड्यांचा बुरखा टराटरा फाडला

तुरुंगात असताना दहशतवादी जकीउर रहमान लखवी झाला बाप, ओवैसींनी पाकड्यांचा बुरखा टराटरा फाडला

पाकिस्तान दहशतवादाला पोसतो ही गोष्ट हिंदुस्थानने अनेकदा जगासमोर उघड केली आहे. पहलगाम हल्ल्यातही पाकिस्तानचा हात असल्याचे उघड झाले आणि हिंदुस्थानने ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तान, पीओकेतील दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. त्यानंतर ‘ऑपरेशन सिंदूर’चा संदेश जगात पोहचविण्यासाठी केंद्र सरकारने 7 शिष्टमंडळ तयार केले. या शिष्टमंडळांनी अनेक देशांना भेट देऊन दहशतवाद पोसणाऱ्या पाकिस्तानचा पर्दाफाश केला. एमआयएमचे नेते असदुद्दीने ओवैसी हे देखील या शिष्टमंडळाचा भाग असून शनिवारी अल्जीरिया येथे हिंदुस्थानी समुदायाला संबोधित करताना त्यांना पाकिस्तानचा बुरखा फाडला.

मुंबईवर झालेल्या 26/11 दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड जकीउर रहमान लखवी हा तुरुंगात असतानाही बाप झाला होता, याची आठवणही त्यांनी करून दिली. तसेच दहशतवाद्यांना आश्रय देण्याचे इस्लामाबादचे धोरण दक्षिण आशियात अस्थिरता निर्माण करत असल्याचेही ते म्हणाले.

कॉपी करायलाही अक्कल लागते, असीम मुनीर पाकिस्तानचे हसे करत आहे; ओवैसींनी पाकड्यांना चांगलेच फटकारले

ओवैसी यांनी जकीउर रहमान लखवीचा उल्लेख करत पाकड्यांवर हल्ला चढवला. जकीउर रहमान लखवी नावाचा एक दहशतवादी आहे. जगातील कोणताही देश दहशतवादाच्या आरोपाखाली असलेल्या दहशतवाद्याला तुरुंगाबाहेर येऊ देत नाही, परंतु पाकिस्तानमध्ये हा दहशतवादी तुरुंगात बसून बाप बनला आहे. एफएटीईने पाकिस्तानला ग्रे लिस्टमध्ये टाकल्यानंतर त्याच्यावरील खटला सुरू झाला. आताही पाकिस्तानला पुन्हा ग्रे लिस्ट टाकावे अशी मागणीही ओवैसी यांनी केली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;