NIA ची आठ राज्यांत 15 ठिकाणी धाड, पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपातून काही जण ताब्यात
राष्ट्रीय तपाससंस्थेने शनिवारी पाकिस्तानसाठी हेरगिरी करण्यासंबंधित आठ राज्यांत 15 ठिकाणी छापे मारले आहेत. NIA ने दिल्ली, हरयाणा, उत्तर प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, आसाम, पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्रात या धाडी घातल्या आहेत. सीआरपीएफचा जवान मोती राम जाटशी चौकशी केल्यानंतर NIA ने ही कारवाई केली आहे.
पाकिस्तान इंटेलिजन्स ऑपरेटिव्हशी संबंधित संशयित लोकांवर या धाडी टाकण्यात आल्या आहेत. या वेळी NIA च्या टीम्सने वेगळ्या वेगळ्या ठिकाणाहून इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स आणि संवेदनशील आर्थिक कागदपत्र जप्त केली आहेत. हिंदुस्थानविरोधी अतिरेकी कारवायासंबंधित पुरावे मिळवण्यासाठी सखोल तपास सुरू आहे. यामुळे पाकिस्तानचा खरा चेहरा जगासमोर येईल.
NIA ने तपासादरम्यान ज्या संशयित लोकांना ताब्यात घेतले आहे त्या लोकांचा पाकिस्तानशी संबंध असल्याचे समोर आले आहे. हे लोक पाकिस्तानसाठी हिंदुस्थानविरोधी कारवाया करत होते. हे लोक हिंदुस्थानशी संबंधित संवेदनशील माहिती पाकिस्तानला पुरवत होते. या माहितीच्या बदल्यात आरोपींना पाकिस्तानकडून पैसे मिळत होते, याचा तपास NIA करत आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List