रिंकू सिंहची विकेट पडली, थेट खासदार पटवली; लग्नाची तारीखही झाली निश्चित

रिंकू सिंहची विकेट पडली, थेट खासदार पटवली; लग्नाची तारीखही झाली निश्चित

टीम इंडियाचा स्टार क्रिकेटपटू रिंकू सिंह याची विकेट पडली आहे. रिंकू सिंह याने थेट खासदार पटवली असून दोघांच्या लग्नाची तारीखही निश्चित झाली आहे. 8 जून रोजी दोघांचा साखरपुडा होईल आणि याच वर्षी 18 नोव्हेंबर रोजी लग्नाचा बार उडेल. या लग्नात दोघांचे कुटुंबीय, मित्र परिवार आणि निवडक लोक उपस्थित राहतील.

रिंकू याच्या होणाऱ्या पत्नीचे नाव प्रिया सरोज आहे. ती समाजवादी पार्टीची खासदार आहे. 2024 मध्ये झालेल्या निवडणुकीत ती मछलीशहर मतदारसंघातून निवडणूक लढली आणि जिंकली होती. तिने बीपी सरोज यांचा 35850 मतांनी पराभव केला होता.

दरम्यान, याच वर्षी जानेवारी महिन्यात रिंकू आणि प्रिया सरोज यांच्या लग्न पक्के झाले होते आणि सुपारी फुटली होती. आता लग्नाची तारीख देखील निश्चित झाली असून 8 जून रोजी दोघे एकमेकांच्या बोटात रिंग घालतील. तर 18 नोव्हेंबर दोघे एक दुजे के होतील.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;