Mumbai News – मुंबई विमानतळावर दुर्मिळ वन्य प्राण्यांच्या तस्करीचा पर्दाफाश, एका प्रवाशाला अटक

Mumbai News – मुंबई विमानतळावर दुर्मिळ वन्य प्राण्यांच्या तस्करीचा पर्दाफाश, एका प्रवाशाला अटक

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर वन्यजीव तस्करीचा पर्दाफाश करत एका हिंदुस्थानी नागरिकाला अटक करण्यात आली आहे. ताब्यात घेतलेला प्रवासी थायलंडहून दुर्मिळ आणि संरक्षित प्राण्यांची तस्करी करत होता. बँकॉकहून मुंबईत आलेल्या विमानातून ही तस्करी करण्यात येत होती. मात्र सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी हा प्रयत्न हाणून पाडला.

सदर प्रवाशाच्या हालचाली संशयास्पद आढळल्याने सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्याला थांबवले. प्रवाशाच्या बॅगांची तपासणी करत असताना सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना आत दुर्मिळ प्राणी आढळले. प्रवाशाच्या बॅगेत तीन जिवंत स्पायडर टेल्ड हॉर्नड वाइपर, पाच एशियन लीफ आणि इंडोनेशियन पिट व्हायपर टर्टल (43 जिवंत आणि 1 मृत) आढळले.

सीमाशुल्क विभागाने सदर प्रवाशाला ताब्यात घेत त्याच्यावर कारवाई सुरू केली. प्रवाशाला कस्टम्स कायदा, 1962 अंतर्गत अटक करण्यात आली असून त्याच्याकडील प्राणी जप्त करण्यात आले आहेत. या प्राण्यांची तस्करी कुठे होणार होती याबाबत अधिकारी तपास करत आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;