तुम्ही कृष्णाची नारायणी सेना घेऊ शकता, पण कृष्ण नाही! तेज प्रताप यांचा दोन भावात यादवी माजवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना इशारा

तुम्ही कृष्णाची नारायणी सेना घेऊ शकता, पण कृष्ण नाही! तेज प्रताप यांचा दोन भावात यादवी माजवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना इशारा

 

राष्ट्रीय जनता दल पक्षाचे सर्वेसर्वा लालूप्रसाद यादव यांचा मोठा मुलगा तेज प्रताप यादव पुन्हा एकदा चर्चेत आहे. पक्ष आणि कुटुंबातून बाहेरचा रस्ता दाखवलेल्या तेजप्रताप यादव यांनी एक भावूक पोस्ट शेअर केली आहे. ताज्या पोस्टमध्ये त्यांनी श्रीकृष्ण आणि अर्जुनाचा उल्लेख केला असून नात्यांमधील तणाव, कुटुंबापासून विभक्त होण्याची भीती त्यांच्या पोस्टमधून दिसत आहे.

तेजप्रताप यांनी महाभारताच्या युद्धात शंखनाद करणाऱ्या श्रीकृष्ण आणि अर्जुनाचा फोटो शेअर केला आहे. यासोबत त्यांनी अत्यंत भावूक करणारे कॅप्शन लिहिले आहे. माझा अर्जुनाला माझ्यापासून वेगळे करण्याचा प्रयत्न होत आहे. पण तुम्ही यात कधीच यशस्वी होणार नाहीत. तुम्ही कृष्णाची नारायणी सेना घेऊ शकता, पण कृष्ण नाही. प्रत्येक षडयंत्र लवकरच उघड करेन. भावा, फक्त विश्वास ठेव. मी कोणत्याही परिस्थितीमध्ये तुझ्या सोबतच असेल. सध्या दूर असलो तरी माझा आशीर्वाद तुझ्यासोबत आहे आणि कायम राहील. आई बाबांची काळजी घे, कारण प्रत्येक ठिकाणी जयचंद आहेत. आतही आणि बाहेरही, अशी पोस्ट तेजप्रताप यांनी लिहिली आहे. याआधीही त्यांनी एक पोस्ट केली होती आणि त्यात वडील लालूप्रसाद यादव आणि आई राबडी देवी माझ्यासाठी देवाहून अधिक असल्याचे म्हटले होते.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;