शाळकरी मुलींचा पाठलाग करून विनयभंग, दोन आरोपींना 6 महिन्याचा तुरुंगवास

शाळकरी मुलींचा पाठलाग करून विनयभंग, दोन आरोपींना 6 महिन्याचा तुरुंगवास

शाळेत जाणाऱ्या मुलींचा पाठलाग करून त्यांचा विनयभंग केल्याप्रकरणी दोघांना सहा महिन्याच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. तसेच प्रत्येकी पाच हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अशोक शिवाजी अडसुळे (31) आणि विजय भागवत लोहार (34) आशी या आरोपींची नावे आहेत. हे दोघेही नराधम शाळकरी मुलींचा पाठलाग करून त्यांना त्रास द्यायचे. कुटुंबीयांना याची माहिती मिळताच त्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली. यानंतर वरिष्ठांच्या मार्गदर्शनात उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील गोसावी, पोलीस ठाणे मुरुडचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक उजगरे यांनी तपास करून आरोपी विरुद्ध पुरावे जमा करून दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले होते.

दरम्यान, लातूर येथील प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाने सदर प्रकरणात कलम 354(ड) भादंवी प्रमाणे आरोपींना दोषी ठरवून त्यांना सहा महिने कारावास व प्रत्येकी रु. 5000/- दंड ठोठावला आहे.

वरिष्ठांचे मार्गदर्शनात उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील गोसावी, सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक उजगरे व मदतनीस पोलिस अंमलदार तसेच कोर्ट ट्रायल मॉनिटरिंग सेलचे पोलीस उपनिरीक्षक रोहन पाटील, कोर्ट पैरवी अमलदार इम्रान शेख, कोर्ट ड्युटी महिला पोलीस अंमलदार प्रेमला सगर यांनी यासाठी मदत केली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;