‘अजित पवार तुमचा माणूस…’, लक्ष्मण हाकेंचा पुन्हा अमोल मिटकरींवर घणाघात

‘अजित पवार तुमचा माणूस…’, लक्ष्मण हाकेंचा पुन्हा अमोल मिटकरींवर घणाघात

ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांच्यामध्ये आता चांगलंच आरोप-प्रत्यारोपाचं राजकारण रंगल्याचं पाहायला मिळत आहे. ‘विधानसभा निवडणुकीत ओबीसी उमेदवारांना उभं करून हाकेंनी तोडपाणी केली. लोहा मतदारसंघानंतर आता हाके यांच्याकडून भोकर विधानसभेत तोडपाणी करण्यात आली’.  असा आरोप अमोल मिटकरी यांनी केला होता, अमोल मिटकरी यांच्या या आरोपाला आता हाकेंकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलं आहे.  उमेदवारी मागे घेतलेल्या माणसाबरोबर कधी मॅनेजमेंट होऊ शकते? असा सवाल हाके यांनी केला आहे.

नेमकं काय म्हणाले हाके? 

अमोल मिटकरी एकीकडे म्हणतात माझी औकात नाही, आणि दुसरीकडे म्हणतात मी उमेदवार मॅनेज करतो. अजित पवार तुमचा माणूस बावचळला आहे,  अजित पवार तुम्ही ओबीसींच्या मुलांना वसतिगृह का देत नाहीत?  अजित पवार यांनी माझ्या पाठीमागे त्यांची पलटण लावली आहे, अमोल मिटकरींचा स्क्रू ढिल्ला झाला आहे, असा घणाघात यावेळी लक्ष्मण हाके यांनी केला आहे.

दरम्यान पुढे बोलताना ते म्हणाले की, आम्ही महायुतीला पाठिंबा दिला, पण ते आम्हाला विरोध करत आहेत, मग तुम्ही महायुतीच्या बाजुने आहात की विरोधात आहात असा सवालही यावेळी हाके यांनी मिटकरी यांना केला आहे. ज्यांना कोणी विचारत नाहीत अशी माणसं माझ्यावर सोडतात असं म्हणत हाके यांनी यावेळी अजित पवार यांना देखील टोला लगावला आहे.

सुरज चव्हाण यांच्या ट्विटवर देखील हाके यांनी यावेळी प्रतिक्रिया दिली आहे,  मी कलंक आहे की नाही? हे माझा ओबीसी समाज, धनगर समाज ठरवेल, मला तुमच्या सर्टिफिकेटची गरज नाही, असा हल्लाबोल यावेळी हाके यांनी केला आहे.

अजित पवार हे शरद पवार यांच्या रिचार्ज वर चालतात, अजित पवार यांना आता पंख फुटले आहेत.  भारतातील 80 टक्के दारूचं उत्पादन महाराष्ट्रात होतं, महाराष्ट्रात होणारं दारूचं उत्पादन सुनील तटकरेंच्या पक्षाचे कारखानदार आणि भांडवलदार मंडळी करतात मी एका वाटीत तोडपाणी करतो, अजित पवार हे समुद्रात तोडपाणी करतात, असा टोलाही यावेळी हाके यांनी लगावला आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;