शिवद्रोही कुलकर्णीच्या प्रतिमेला साताऱ्यात ‘जोडे मारो’

शिवद्रोही कुलकर्णीच्या प्रतिमेला साताऱ्यात ‘जोडे मारो’

आंबेगाव (पुणे) येथील शिवसृष्टीच्या प्रवेशद्वारावर गाडीच्या हेडलाईटच्या उजेडामध्ये शिवसृष्टीचे फलक दिसत असताना, जाणूनबुजून लघुशंका करणाऱ्या शिवद्रोही अमोल अरुण कुलकर्णीच्या प्रतिमेला जोडे मारून त्याचे दहन करण्यात आले. ‘मी मुस्लिम मावळा छत्रपतींचा’ संघटनेच्या वतीने साताऱ्यात आंदोलन करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराजांची विटंबना करणे, हा देशद्रोह म्हणून गुन्हा दाखल केला जावा, अशी मागणी करीत यावेळी राज्य सरकारकडे संघटनेच्या वतीने निदर्शने करण्यात आली.

कोश्यारी, छिंदम, त्रिवेदी, सोलापूरकर, कोरटकर आणि आता अमोल कुलकर्णी हे जाणूनबुजून छत्रपती शिवाजी महाराजांची विटंबना करत आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन सत्ता मिळवली जाते आणि त्याठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अवमानप्रकरणी देशद्रोह किंवा राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याचा कायदा का होत नाही, असा सवाल संघटनेचे अरबाज शेख यांनी केला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अवमानाच्या घटना प्रशासनाने त्वरित थांबवाव्या अन्यथा प्रशासनाच्या कमजोरीमुळे विटंबना करणाऱ्याचा चौरंगा केला जाईल, असा इशारा अरबाज शेख यांनी दिला. आंदोलनप्रसंगी हाजी नदाफ, सलमान शेख, शाहरुख शेख, असिफ नगारजी, मुजफ्फर सय्यद, मुक्तार बावा, अजहर शेख, जमीर शेख, अब्बास शेख व इतर उपस्थित होते.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;