लग्नाचा आनंद शोकसभेत बदलला, रस्ते अपघातात वधूच्या आजोबांसह चार जणांचा मृत्यू
राजस्थानमध्ये एक अत्यंत दुःखद घटना घडली आहे. ज्यामध्ये येथील एका लग्नाचा आनंद शोकसभेत बदलला आहे. शनिवारी रात्री येथील डुंगरपूर जिल्ह्यातील हिलावाडी गावाजवळ झालेल्या रस्ते अपघातात वधूच्या आजोबांसह चार जणांचा मृत्यू झाला. तर 8 जण जखमी झाले आहेत. रविवारी सकाळी सागवाडा आणि डुंगरपूर रुग्णालयांच्या शवागारात शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले आहेत. तर जखमींवर उपचार सुरू आहेत.
अपघाताची माहिती देताना स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं की, शनिवारी रात्री क्रूझर जीपमधून प्रवास करणारे लोक पिंडवाल येथील लग्न समारंभाला उपस्थित राहून बोडीगामाला परतत होते. पिंडवाल हिलवाडी बसस्थानकाजवळ जीप अनियंत्रित झाली आणि रस्त्याच्या कडेला उलटली. ज्यामध्ये अनेक लोक जखमी झाले. जखमींना मदत करण्यासाठी आजूबाजूचे लोक धावले. तसेच रुग्णवाहिकाही घटनास्थळी पोहोचली. जखमींना वाचवण्यात लोक प्रयत्न करत होते. याचदरम्यान सबला येथून येणाऱ्या एका भरधाव ट्रकने जखमींना आणि त्यांच्या मदतीला आलेल्या लोकांना चिरडले.
यानंतर ट्रकने अपघातग्रस्त क्रूझर जीप आणि रस्त्यावर उभ्या असलेल्या दुचाकीला धडक दिली. जखमींना घेण्यासाठी आलेल्या रुग्णवाहिकेलाही ट्रकने धडक दिली. या भीषण अपघातात अनेक लोक ट्रकखाली अडकले. ज्यामध्ये 4 जणांचा मृत्यू झाला.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List