राज्यात 41 हजार हेक्टरवरील पिकांना पावसाचा फटका, वापसा नसल्याने खरीप पेरण्या लांबणीवर पडणार

राज्यात 41 हजार हेक्टरवरील पिकांना पावसाचा फटका, वापसा नसल्याने खरीप पेरण्या लांबणीवर पडणार

राज्यामध्ये गेले काही दिवस होत असलेल्या मुसळधार पावसामुळे शेतपिकांचे आणि जमिनीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, आजअखेर हा आकडा 40 हजार 949 हेक्टरवर पोहोचला आहे. यामध्ये प्रामुख्याने काढणीला आलेला उन्हाळी कांदा, बाजरी, मका, तसेच भाजीपाल्याच्या पिकांचा समावेश आहे. शेतकऱयांच्या हातातोंडाशी आलेला घास या पावसामुळे हिरावला गेला आहे.

कृषी विभागाकडून शेतपिकांच्या नुकसानीचे पंचनामे सध्या सुरू आहेत. कृषी आयुक्तालयाकडे आज प्राप्त झालेल्या अहवालानुसार, अमरावती, बुलढाणा, जळगाव, नाशिक आणि अहिल्यानगर या जिह्यांना सर्वाधिक तडाखा बसला आहे. मे महिन्याच्या पहिल्या आठवडय़ापासून बहुतांशी जिह्यांत मान्सूनपूर्व पावसाच्या हजेरीस सुरुवात झाली. राज्यभरात जवळपास गेले 20 दिवस पावसाने 34 तालुक्यांत हजेरी लावली. अनेक तालुक्यांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे. गेल्या दोन दिवसांपासून राज्याच्या अनेक भागांत वेळेआधी मान्सूनदेखील सक्रिय झाला. याचा एकत्रित परिणाम राज्यातील उन्हाळी पिकांना, त्याचबरोबर खरिपासाठी आगाऊ घेतल्या जाणाऱया पिकांनादेखील बसला आहे. पावसाचे हे प्रमाण असेच सुरू राहिल्यास नुकसानीचा आकडा वाढणार आहे.

प्रामुख्याने उन्हाळी हंगामातील भात, मूग, उडीद, ज्वारी, तीळ, मका, भुईमूग, कांदा, भाजीपाला, टोमॅटो, कांदा, बटाटा, लिंबू, पपई, केळी, संत्रा, मोसंबी, आंबा उत्पादनांचे नुकसान झाले आहे. तसेच अन्य फळबागांनाही हानी पोहोचली आहे. सिंधुदुर्ग, नाशिक जिह्यांत शेतकऱयांनी तयार केलेल्या भातरोपवाटिकाही वाया गेल्याची स्थिती आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;