रविवारपासून बेस्ट मार्गात बदल, काही ठिकाणी नवीन बस मार्ग सुरू करणार

रविवारपासून बेस्ट मार्गात बदल, काही ठिकाणी नवीन बस मार्ग सुरू करणार

बेस्टकडून भाडेवाढ झाल्यानंतर आता बसच्या ताफ्यात नवीन वातानुकूलित बस सामील होणार आहेत. त्यामुळे बेस्टच्या काही मार्गात रविवार, 1 जूनपासून बदल केले जाणार आहेत तर काही नवे बस मार्ग सुरू केले जाणार आहेत. मंत्रालय ते ठाण्यातील दादलानी पार्क दरम्यान आणि प्रतीक्षानगर आगार ते पोर्तुगीज चर्चदरम्यान नवीन बसमार्ग सुरू करण्यात येणार आहेत, तर काही बस मार्ग खंडित करण्यात येणार आहेत.

– मंत्रालय ते बाळकूम दादलानी पार्कदरम्यान पूर्व मुक्त मार्गाने नवीन बसमार्ग ए 490 सुरू करण्यात येणार आहे. या मार्गावर बस सकाळी ठाण्याहून 7.30 ते 8.00 वाजता सुटेल तर संध्याकाळी मंत्रालयाहून 5.30 व 6 वाजता बस सुटणार आहे तर ए 175 ही नवीन बस प्रतीक्षानगर, अॅण्टॉप हिल, वडाळा चर्च, दादर, प्लाझा, शिवाजी पार्क, पोतुगीज चर्च, कबुतरखाना, प्लाझामार्गे वर्तुळाकार धावणार आहे.

– बॅकबे आगार ते राणी लक्ष्मीबाई चौकदरम्यान धावणारी ए सी 10 ही बस आता पी डिमेलोमार्गे न जाता म्युझियम, हुतात्मा चौक, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, महात्मा फुले मंडई, मेट्रो, काळबादेवी, भुलेश्वर, जे. जे. रुग्णालय, माझगावमार्गे डॉकयार्ड रोडमार्गे शीव येथे जाणार आहे तर नेव्हीनगर ते वांद्रे वसाहतदरम्यान धावणारी 11 मर्यादित आता भारतमाता उड्डाणपुलामार्गे जाणार आहे. त्यामुळे या बसला आता लालबाग, जयहिंद आणि जिजामाता उद्यान हे थांबे नसतील.

– बस क्रमांक 212 ही वांद्रे रेक्लेमेशन बस स्थानकाहून शिवडीकडे जाताना हिंदमातामार्गे न जाता शारदा सिनेमा व भोईवाडामार्गे जाईल . शिवाजीनगर आगारहून दिंडोशीकडे जाताना बस क्रमांक ए 488 आता कमानी बैल बाजारमार्गे न जात जांभुळपाडा असल्फामार्गे जाईल, तर जोगेश्वरी पुलावरून जाणारी ए 180 ही बस आता पुन्हा गोखले पुलावरून धावणार आहे.

या बसमार्गांचे वातानुकूलित बसमार्गात रूपांतर
– 8 मर्यदित – मंत्रालय ते शिवाजी नगर टर्मिनस
– 44 – श्रावण यशवंते चौक काळाचौकी ते वरळी आगार
– 125 – वरळी आगार ते नेव्ही नगर
– 241 – सांताक्रुझ आगार ते मालवणी आगार
– 243 – मालाड स्थानक पश्चिम ते जनकल्याण नगर
– 343 – गोरेगाव स्थानक (पूर्व) ते चित्रनगरी
– 347 – गोरेगाव स्थानक (पूर्व) ते गोकुळधाम
– 452 – गोरेगाव स्थानक (पूर्व) ते मयूरनगर
– 459 मर्यादित – मालवणी आगार ते मुलुंड स्थानक (पश्चिम)
– 602 – कांजूरमार्ग स्थानक (पूर्व) ते हिरानंदानी
– 626 – मालाड स्थानक (पश्चिम) ते भूजले तलाव
– वरळी आगार ते वेसावे यारी रोडपर्यंत धावणारी 56 क्रमांकाची बस फक्त रविवारी वातानुकूलित ए 56 या क्रमांकाने धावणार आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;