Norway chess 2025 – गुकेशने हिकारूला हरविले

Norway chess 2025 – गुकेशने हिकारूला हरविले

बर्थ डे बॉय हिंदुस्थानच्या डी. गुकेशने लागोपाठच्या दोन पराभवांनंतर अखेर तिसऱ्या फेरीत अमेरिकेच्या हिकारू नाकामुरा याचा पराभव करीत नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धेत विजयाचे खाते उघडले. द्वितीय मानांकित हिकारूला हरवून तीन गुणांची कमाई करीत जगज्जेत्या गुकेशने स्पर्धेत जोरदार पुनरागमन केले.

गुकेशला पहिल्या फेरीत यजमान नॉर्वेच्या मॅग्नस कार्लसनने, तर दुसऱ्या फेरीत हिंदुस्थानच्याच अर्जुन एरिगॅसी याने हरविले होते, मात्र पराभवाची कोंडी फोडून गुकेश पुन्हा एकदा विजयरथावर स्वार झाला. या विजयासह तो गुणतक्त्यात पाचव्या स्थानावर आला. अमेरिकेचा फॅबियानो कारूयाना अव्वल स्थानावर आहे. याच फॅबियानोविरुद्ध गुकेश चौथ्या फेरीत भिडणार आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;