काय सांगता, 639 कोटीला विकला गेला मुंबईत फ्लॅट, कोण आहे ती खरेदीदार महिला?

काय सांगता, 639 कोटीला विकला गेला मुंबईत फ्लॅट, कोण आहे ती खरेदीदार महिला?

India Most Expensive Residential Deal : मायानगरीतील एक महागडा सौदा झाला आहे. हा देशातील सर्वात महागडा सौदा मानण्यात येत आहे. दक्षिण मुंबईत वरळी परिसरातील समुद्रालगतच्या इमारतीमधील डुप्लेक्स फ्लॅटची विक्री करण्यात आली आहे. ही दक्षिण मुंबईतील अजून एक महागडी डील ठरली आहे. खरेदीदाराने त्यासाठी एकूण 703 कोटी रुपये मोजले. त्यात रजिस्ट्रीसाठीच 63.9 कोटी रुपये मोजले. कोण आहे ती महिला खरेदीदार?

डुप्लेक्स फ्लॅटसाठी मोजले 703 कोटी

वरळीतील सी फेसिंग लक्झरी डुप्लेक्स फ्लॅटच्या किंमतींने सर्वांचे कान टवकारले आहेत. या डुप्लेक्ससाठी खरेदीदाराने एकूण 703 कोटी रुपये मोजले. या सदनिकेच्या खरेदीसाठी 63.9 कोटी रुपये मोजले. वरळी समुद्र किनाऱ्या लगतच्या Naman Xana मधील दोन फ्लॅटची विक्री झाली आहे. 40 मजली इमारतीमधील 32 व्या आणि 35 व्या मजल्यावरील या दोन फ्लॅटची विक्री भारतातील सर्वात महागडी ठरली आहे.

या फ्लॅटमध्ये खास तरी काय?

वरळी बिंदू माधव ठाकरे चौकातील 40 मजली नमन-झाना या इमारतील 32 आणि 35 मजल्यांवर हे दोन फ्लॅट्स असून 22,572 चौरस फूट आकाराचचे आहे. फ्लॅट्ससाठी प्रति चौरस फूट दर 2.83 लाख रुपये असून या 22,572 चौरस फूट च्या फ्लॅट साठी आतापर्यंतची सर्वाधिक रक्कम मोजण्यात आली आहे. 639 कोटी रुपये फ्लॅटसाठी तर 63.9 कोटी रुपये स्टॅम्प ड्युटी आणि जीएसटीसाठी देण्यात आल्याचे समोर येत आहे.

कोणी खरेदी केला हा फ्लॅट

दिग्गज फार्मा कंपनी USV India च्या अध्यक्ष लीना तिवारी यांनी हे दोन्ही फ्लॅट खरेदी केले आहेत. इकोनॉमिक्स टाईम्सनुसार, लीना तिवारी यांनी देशातील सर्वात महागडी मालमत्ता खरेदी करून अनेक दिग्गजांना मागे टाकले आहे. लीना तिवारी यांची गणना ही देशातील श्रीमंत महिलांमध्ये करण्यात येते. त्यांचे आजोबा विठ्ठल बालकृष्ण गांधी यांनी 1961 मध्ये ही कंपनी स्थापन केली होती. 30 हजार कोटींची मालकीण असलेल्या लीना तिवारी या समाज माध्यमांपासून चार हात दूर राहतात. या महागड्या डीलची मुंबईतच नाही तर देशभरात चर्चा सुरू आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;