मोदी स्वत:च्या पत्नीला सिंदूर का देत नाहीत? भाजपच्या ‘ऑपरेशन बंगाल’वरून भडकल्या ममता

मोदी स्वत:च्या पत्नीला सिंदूर का देत नाहीत? भाजपच्या ‘ऑपरेशन बंगाल’वरून भडकल्या ममता

सिंदूर पवित्र मानला जातो. प्रत्येक महिलेसाठी तो सन्मान असतो. प्रत्येक महिलेला तिचा पती सिंदूर लावत असतो, देत असतो. परंतु तुम्ही पत्नीला सिंदूर का देत नाही, असा थेट सवाल करीत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार हल्लाबोल केला. पंतप्रधान विरोधकांना सांगतात ‘ऑपरेशन सिंदूर’चे राजकारण करू नका आणि त्यांचे सरकार मात्र त्यावरून राजकीय होळी खेळत आहे, असेही ममता बॅनर्जी यांनी सुनावले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची गुरुवारी पश्चिम बंगाल येथे अलिपूरद्वारमध्ये सभा झाली. यावेळी मोदींनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या सरकारवर हिंसाचारावरून टीका केली. भ्रष्टाचाराचेही आरोप केले. यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष सुकांता मुजूमदार यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’सारखे ‘ऑपरेशन बंगाल’ राबवून तृणमूल सरकारला पश्चिम बंगालमधून हाकलून लावण्याचे आवाहन केले. या वक्तव्यावरून ममता बॅनर्जी यांनी पत्रकार परिषद घेऊन संताप व्यक्त केला.

तुम्ही मला बोलण्यास भाग पाडले

सिंदुर हा पवित्र मानला जातो. प्रत्येक महिलेचा तो सन्मान असतो. प्रत्येक महिलेला तिचा पती सिंदूर लावत असतो, देत असतो. परंतु तुम्ही पत्नीला सिंदूर का देत नाही? सॉरी टू से, खरं तर मला याबद्दल बोलायचे नव्हते पण तुम्ही मला बोलण्यास भाग पाडले, असे ममता बॅनर्जी यांनी सांगितले.

विरोधी पक्षांचा पूर्ण पाठिंबा तरीही तुम्ही आरोप करता

‘ऑपरेशन सिंदूर’ला विरोधी पक्षांनी संपूर्ण पाठिंबा दिला. लोकशाही वाचविण्यासाठी, देशाची ठोस बाजू आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर मांडण्यासाठी विरोधी पक्षांचे खासदार परदेशात असताना तुम्ही (मोदी) मात्र येथे विरोधी पक्षांवर आरोप करत आहात. पंतप्रधान जे बोलत आहेत ते पूर्णपणे चुकीचे आहे. पेंद्र सरकार राजकीय होळी खेळत आहे. भाजप ही जुमला पार्टी आहे, असे त्यांनी फटकारले.

तुम्ही राजकारण करता, देशभर सभा घेता

‘ऑपरेशन सिंदूर’ हे नाव जाणूनबुजून राजकीय आकर्षण मिळवण्यासाठी देण्यात आले. पंतप्रधान मोदी विरोधकांना सांगतात राजकारण करू नका, पण ते स्वतःच राजकारण करत आहेत. देशभर सभा घेत आहेत, अशी टीकाही ममता बॅनर्जी यांनी केली.

– मोदींनी पश्चिम बंगालच्या महिलांचा अपमान केला आहे. आम्ही सर्वांचा आदर करतो पण स्वाभिमानाच्या किमतीवर नाही. ‘ऑपरेशन बंगाल’ करायचे असेल तर उद्या निवडणुका घ्या, आम्ही तयार आहोत.

– ममता यांनी मोदींना थेट चर्चेसाठी आव्हान दिले. जर तुमच्यात हिंमत असेल तर माझ्यासोबत लाईव्ह टीव्ही चर्चेसाठी या. तुम्हाला हवे असेल तर टेलिप्रॉम्प्टर घेऊन या, असा टोलाही ममता यांनी लगावला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;