आम्ही हल्ला करायच्या आधीच हिंदुस्थानने ब्रह्मोस मिसाईलने हल्ले केले, पाकिस्तानी पंतप्रधानांची कबूली

आम्ही हल्ला करायच्या आधीच हिंदुस्थानने ब्रह्मोस मिसाईलने हल्ले केले, पाकिस्तानी पंतप्रधानांची कबूली

ऑपरेशन सिंदूरबाबत पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी अझरबैजान येथे एक मोठं वक्तव्य केलं आहे. ”आम्ही हिंदुस्थानवर हल्ला करणार होतो मात्र त्याआधीच हिंदुस्थानने 9-10 मे च्या मध्यरात्री रावळपिंडीतील विमानतळ व इतर प्रमुख लष्करी तळांवर ब्राह्मोस क्षेपणास्त्रे डागली. हिंदुस्थानच्या या हल्ल्याबाबत आम्हाला कल्पना नव्हती”, अशी कबूली पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष शाहबाज शरीफ यांनी दिली आहे.

अझरबैजान हा देश हिंदुस्थान पाकिस्तान तणावाच्या वेळी पाकिस्तानच्या बाजूने होता. या देशात आयोजित एका कार्यक्रमात बोलताना शरीफ यांनी ही माहिती दिली. ”आमचे लष्कर प्रमुख असिम मुनीर यांनी 10 मे रोजी सकाळच्या नमाजानंतर हिंदुस्थानवर हल्ला करण्याची योजना आखली होती. मात्र पहाट होण्याच्या आधीच लांब पल्ल्याची सुपरसॉनिक ब्राह्मोस क्रूझ क्षेपणास्त्रे पाकिस्तानच्या वेगवेगळ्या प्रांतांमध्ये डागण्यात आली”, असे शाहबाज म्हणाले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;