तुमच्या पत्नीला तुम्ही सिंदूर का देत नाही ? ममता बॅनर्जी यांचा पंतप्रधानांना बोचरा सवाल

तुमच्या पत्नीला तुम्ही सिंदूर का देत नाही ? ममता बॅनर्जी यांचा पंतप्रधानांना बोचरा सवाल

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पश्चिम बंगालमध्ये भाषण करताना मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर टीका केली. या टीकेला उत्तर देताना ममता बॅनर्जी यांनी जोरदार टीका केली. यावेळी ऑपरेशन सिंदूरवर बोलताना ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना एक बोचरा सवाल केला आहे. ”सिंदूर हा प्रत्येक महिलेचा सन्मान असतो. प्रत्येक महिलेला तिचा पती सिंदूर लावत असतो देत असतो. पण तुमच्या पत्नीला तुम्ही सिंदूर का देत नाही ? असा बोचला सवाल ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केला आहे.

यावेळी ममता बॅनर्जी यांनी मोदींना एक आव्हान देखील दिलं. जर तुम्हाला ऑपरेशन पश्चिम बंगाल करायचं असेल तर उद्या निवडणूका जाहीर करा. आम्ही तयार आहोत. बंगाल तयार आहे, असे आवाहन ममता दिदींनी दिले. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच ऑपरेशन सिंदूरचे राजकारण करत आहेत अशी टीका देखील केली.

”ऑपरेशन सिंदूर हे नाव राजकीय हेतूने देण्यात आलेले आहेत. ते विरोधकांना सांगतात की ऑपरेशन सिंदूरचे राजकारण करू नका आणि स्वत: मात्र त्यावरून राजकीय होळी खेळतात, असा हल्लाबोल त्यांनी केला. ”विरोधी पक्षाचे खासदार परदेशात जाऊन देशाची प्रतिष्ठा वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. आणि पंतप्रधान देशात राहून राज्यांची बदनामी करत आहेत. हे पूर्णपणे चुकीचे आहे’, अशी टीका त्यांनी केली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;