IPL 2025 – बंगळुरू एक पाऊल पुढे, पंजाबचा धुव्वा उडवत चौथ्यांदा अंतिम फेरीत

IPL 2025 – बंगळुरू एक पाऊल पुढे, पंजाबचा धुव्वा उडवत चौथ्यांदा अंतिम फेरीत

क्वालिफायर सामन्यात ना थरार दिसला ना फायर. अत्यंत एकतर्फी झालेल्या सामन्यात बंगळुरूने पंजाबचा त्यांच्या घरच्याच मैदानावर 10 षटके आणि 8 विकेट राखून विजय मिळवत आयपीएल कारकीर्दीत चौथ्यांदा अंतिम फेरी गाठली. या विजयामुळे बंगळुरू सर्वप्रथम थेट अंतिम फेरीत पोहोचला असून ते आपल्या जेतेपदाच्या स्वप्नपूर्तीपासून अवघं एक विजय दूर आहेत.

आयपीएलच्या साखळीत नऊ-नऊ विजय मिळवून प्ले ऑफमध्ये पोहोचलेल्या पंजाब आणि बंगळुरू यांच्यातला क्वालिफायर-वन सामना रंगलाच नाही. तब्बल 11 वर्षांनंतर प्ले ऑफची पायरी चढणाऱया पंजाबच्या फलंदाजांनी घोर निराशा केली. खणखणीत सलामी देणाऱया प्रियांश आर्य आणि प्रभसिमरन सिंहने आज मोक्याच्या क्षणी धोका दिला. ही जोडी फुटल्यानंतर धरण फुटावं तशी पंजाबची फलंदाजी फुटली. संघात कमबॅक करणाऱया जॉश हेझलवूडने संघात जोश आणणारी कामगिरी करत जॉश इंग्लिस (4), श्रेयस अय्यर (2) यांना 4 चेंडूंत बाद केले. मग सुयश शर्माने भन्नाट फिरकी मारा करत शशांक सिंह (3) आणि मुशीर खान (0) यांचे त्रिफळे उडवत सामनाच संपवला. यानंतर पंजाबचा डाव संपण्याची औपचारिकता हेझलवूडने अझमतुल्लाह ओमरझइला बाद करून केली. हेझलवूड आणि सुयश शर्माने प्रत्येकी तीन विकेट घेत पंजाबचा डाव 14.1 षटकांत 101 धावांवर संपवला. 17 धावांत 3 विकेट टिपत पंजाबला खेळविणारा सुयश शर्मा ‘सामनावीर’ ठरला.

सुस्साट सॉल्ट

7 बाद 60 या केविलवाण्या अवस्थेनंतरच पंजाबचा पराभव झाला होता. बंगळुरूने 102 धावांचे माफक आव्हान अवघ्या 10 षटकांतच आपल्या पायदळी तुडवले. फिल सॉल्टने सुस्साट फटकेबाजी करताना 27 चेंडूंत 6 चौकार आणि 3 षटकार ठोकत नाबाद 56 धावांसह क्वालिफायर-वनचा खेळ संपवला. विराट कोहली (12) आणि मयंक अगरवालने (19) सॉल्टसह उपयुक्त भागीदाऱया करत बंगळुरूच्या मोठय़ा विजयासाठी हातभार लावला.

विराट स्वप्नपूर्तीच्या दिशेने

विराट कोहली आयपीएलमधला सर्वात यशस्वी फलंदाज आहे. गेली 18 वर्षे एकाच संघासाठी खेळणारा एकमेव खेळाडू आहे. तरीही तो एकही आयपीएल जेतेपद जिंकू न शकलेला एक दुर्दैवी खेळाडूसुद्धा आहे. आज त्याने स्वप्नपूर्तीच्या दिशेने एक पाऊल टाकले आहे.  आयपीएलच्या इतिहासात बंगळुरूने आज चौथ्यांदा अंतिम फेरीत धडक मारली. विशेष म्हणजे तब्बल नऊ वर्षांनंतर ते पुन्हा एकदा पहिल्यावहिल्या जेतेपदासाठी भिडणार आहेत. 2016 साली ते अंतिम फेरीत पोहोचले आणि उपविजेते ठरले होते. गेल्या सहा वर्षांत ते पाचव्यांदा प्ले ऑफमध्ये पोहोचले, पण ते पहिल्यांदा अंतिम फेरी गाठण्यात यशस्वी ठरले आहेत. विशेष म्हणजे गेल्या चारही स्पर्धांत ते टॉप टू स्थान मिळवण्यात अपयशी ठरले होते.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Kokan News – प्लास्टिक कचरा गोळा करणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळणार बक्षीस; सृजन सायन्स सेंटरचा अभिनव उपक्रम Kokan News – प्लास्टिक कचरा गोळा करणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळणार बक्षीस; सृजन सायन्स सेंटरचा अभिनव उपक्रम
देवरुख शहरातील सृजन सायन्स अँड इनोव्हेशन ऍक्टिव्हिटी सेंटरतर्फे कचरा निर्मूलन मोहीम स्पर्धा विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आली आहे. यामध्ये विद्यार्थ्यांनी जास्तीत...
परतीच्या पावसाने कापलेली भात शेती पुन्हा रुजली, ऑक्टोबर महिना संपला तरीही पाऊस सुरूच
Kokan News – देवरुख येथील सृजन विज्ञान केंद्रात आली अवकाश शास्त्राची नवीन मॉडेल्स
किशोरवयीन मुलांना AI ची भुरळ, वैद्यकीय माहिती आणि रोमान्ससाठी AI चा अधिक वापर!
सरकारकडून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ, 5 रुपयांची दिली मदत; विजय वडेट्टीवार यांच्याकडून संताप व्यक्त
…असा असेल सत्याचा मोर्चा; सर्वपक्षीय बैठकीनंतर अनिल परब यांनी दिली माहिती
तुम्ही पण फ्रिजमध्ये ठेवलेला शिळा भात पुन्हा गरम करून खाता का? मग हे वाचाच; जाणून आश्चर्य वाटेल