‘त्या’ बनल्या मुलींसाठी ऊर्जास्रोत, एनडीएत रंगला ऐतिहासिक पदवीप्रदान सोहळा

‘त्या’ बनल्या मुलींसाठी ऊर्जास्रोत, एनडीएत रंगला ऐतिहासिक पदवीप्रदान सोहळा

संरक्षण अकादमीत (एनडीए) आज झालेला पदवीप्रदान सोहळा ऐतिहासिक ठरला. एनडीएच्या 75 वर्षांतील इतिहासात प्रथमच सतराजणी पदवीच्या मानकरी ठरल्या. दिनदयाल उपाध्याय, गोरखपूर विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. पूनम टंडन यांच्या हस्ते 148व्या तुकडीतील छात्रांना पदवी प्रदान करण्यात आला

यावेळी 339 कॅडेट्सना पदवी प्रदान करण्यात आली.एनडीएचे कमांडंट व्हाइस अॅडमिरल गुरचरणसिंह, डेप्युटी कमांडंट सरताज बेदी, प्राचार्य ओमप्रकाश शुक्ला यावेळी उपस्थित होते.

बीएस्सी शाखेत प्रथम क्रमांक पटकावल्याबद्दल लकी कुमार याला रौप्य पदक आणि चीफ ऑफ आर्मी स्टाफ ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले. बीएस्सी कॉम्प्युटर सायन्समध्ये प्रथम क्रमांक पटकावणाऱया प्रिन्सकुमार कुशवाह याला रौप्य पदक आणि चीफ ऑफ नेव्हल स्टाफ ट्रॉफी प्रदान करण्यात आली. बीए शाखेत प्रथम आल्याबद्दल महिला कॅडेट श्रुती दक्ष हिला रौप्य पदक आणि चीफ ऑफ एअर स्टाफ ट्रॉफी तर बीटेक शाखेत प्रथम पटकावणाऱ्या उदयवीर सिंह नेगी याला रौप्य पदक देऊन सन्मानित करण्यात आले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;