गेट वे ऑफ इंडिया जेट्टी प्रकल्पाच्या गुणवत्तेबाबत भाष्य नाही; सुप्रीम कोर्टाचे स्पष्टीकरण

गेट वे ऑफ इंडिया जेट्टी प्रकल्पाच्या गुणवत्तेबाबत भाष्य नाही; सुप्रीम कोर्टाचे स्पष्टीकरण

गेट वे ऑफ इंडियाजवळ जेट्टी प्रकल्पाचे बांधकाम करण्यास परवानगी देण्याच्या महाराष्ट्र सरकारच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी फेटाळली. त्याचवेळी सरन्यायाधीशांनी ‘आमची मुंबई’ आणि ‘त्यांची मुंबई’ यातील अंतराबाबत मत नोंदवले होते. कुलाब्यात ‘त्यांची मुंबई’ राहते, तर मालाड, ठाणे, घाटकोपरमध्ये ‘आमची मुंबई’ राहते, अशी टिप्पणी सरन्यायाधीशांनी केली. त्याची बरीच चर्चा झाल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी त्याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. दोन दिवसांपूर्वी न्यायालयाने जेट्टी प्रकल्पाच्या गुणवत्तेवर कोणतेही भाष्य केलेले नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

सरन्यायाधीश भूषण गवई आणि न्यायमूर्ती ए. जी. मसीहा यांच्या खंडपीठापुढे गुरुवारी या प्रकरणाची पुन्हा सुनावणी झाली. यावेळी कुलाब्यातील क्लीन अँड हेरिटेज कुलाबा रेसिडेंट्स असोसिएशनच्या वतीने वरिष्ठ वकील संजय घोष यांनी ‘आमची आणि त्यांची मुंबईतील’ सरन्यायाधीशांच्या टिप्पणीचा मुद्दा उपस्थित केला. त्यावर सरन्यायाधीशांनी आपण जेट्टी प्रकल्पाच्या गुणवत्तेवर कोणतेही भाष्य केलेले नाही, असे स्पष्ट केले. वरिष्ठ वकील संजय हेगडे यांच्यामुळे वृत्तपत्रांमध्ये ती विधाने प्रसिद्ध झाली. वास्तविक, ते ‘आमची-त्यांची’ नव्हे, तर ‘आमची-तुमची’ आहे, अशी मिश्किल टिप्पणी सरन्यायाधीशांनी यावेळी केली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;