Nanded News – पोहायला गेलेल्या दोन अल्पवयीन मुलांचा खदानीत बुडून मृत्यू

Nanded News – पोहायला गेलेल्या दोन अल्पवयीन मुलांचा खदानीत बुडून मृत्यू

पोहण्यासाठी खदानीत उतरलेल्या दोन अल्पवयीन मुलांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना नांदेडमधील गारगव्हाण गावात घडली. निखिल वाढवे (15) आणि संघर्ष पडघणे (16) अशी बुडालेल्या दोघांची नावे आहेत. याप्रकरणी मनाठा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. दोन्ही मुलांच्या मृत्यूमुळे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

संघर्ष पडघणे याच्या नात्यात लग्न असल्याने तो गारगव्हाण येथे मामाच्या गावी आला होता. निखिल आणि संघर्ष हे बालमित्र होते. गुरुवारी दुपारी दोघही खदानीत पोहण्यासाठी गेले होते. यावेळी निखिलचा भाऊ सुमेधही सोबत होता. मात्र तो पोहायला उतरला नाही. संघर्ष आणि निखिल पोहायला उतरले असता पाण्याचा अंदाज न आल्याने गटांगळ्या खावू लागले. दोघांना बुडताना पाहून सुमेधने तात्काळ घरच्यांना याबाबत माहिती दिली. यानंतर नातेवाईकांसह गावकऱ्यांनी खदानीकडे धाव घेत दोघांना बाहेर काढले. दोघांनाही उपचारासाठी हदगाव येथील उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी दोघांनाही मृत घोषित केले.

नांदेड नागपूर या राष्ट्रीय महामार्गासाठी लागणारा मुरुम काढण्यासाठी पुंडलिक वाढवे या शेतकऱ्याच्या ही खदान खोदण्यात आली होती. नुकत्याच झालेल्या पावसामुळे खदानीत पाणी साचले होते. संघर्ष आणि निखिलला या खदानीत पोहण्याचा मोह आवरला नाही. हाच मोह त्यांच्या जीवावर बेतला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;