दक्षिण कोरियाच्या नौदलाचे विमान कोसळले, चार क्रू मेंबर्सचा मृत्यू

दक्षिण कोरियाच्या नौदलाचे विमान कोसळले, चार क्रू मेंबर्सचा मृत्यू

दक्षिण कोरियाचे एक सागरी गस्ती विमान गुरुवारी कोसळले. या दुर्घटनेत विमानातील चार क्रू मेंबर्सचा मृत्यू झाला. उड्डाणानंतर लगेचच दक्षिणेकडील पोहांग शहरातील एका लष्करी तळाजवळ विमान कोसळले, असे नौदलाने सांगितले.

दुर्घटनेबाबत नौदलाने एक निवेदन जारी केले आहे. यात दुपारी 1 वाजून 43 मिनिटांनी प्रशिक्षण मोहिमेवर असलेले P-3 हे विमान एअरफील्ड सोडल्यानंतर सुमारे सहा मिनिटांनी कोसळल्याचे म्हटले आहे. यात विमानातील चार क्रू मेंबर्सचा मृत्यू झाला.

क्रू सदस्यांचे अवशेष सापडले आहेत. या दुर्घटनेत कोणत्याही नागरिकाच्या जीवितहानीची नोंद नसल्याचे नौदलाने स्पष्ट केले. हा अपघात नेमका कसा घडला याबाबत अद्याप माहिती मिळाली नाही. विमानाच्या अपघाताची चौकशी सुरू करण्यात आली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;