French open 2025 – मॅरेथॉन लढतींनी गाजला गुरुवारचा दिवस

French open 2025 – मॅरेथॉन लढतींनी गाजला गुरुवारचा दिवस

फ्रेंच ओपन ग्रॅण्डस्लॅम टेनिस स्पर्धेतील गुरुवारचा दिवस मॅरेथॉन लढतींनी गाजला. फ्रान्सचा अर्थर फिल्स, कझाकिस्तानचा अलेक्झांडर बबलिक व पोर्तुगालचा हेन्रीक रोचा यांनी पाच सेटपर्यंत रंगलेल्या लढतीत बाजी मारत तिसऱ्या फेरीत धडक दिली.

चौदाव्या मानांकित अर्थर फिल्सने दुसऱया फेरीत स्पेनच्या जौम मुनार याचा मॅरेथॉन लढतीत 7-6(7/3), 7-6(7/4), 2-6, 0-6, 6-4 असा पराभव केला. टायब्रेकपर्यंत ताणलेल्या पहिल्या दोन सेटमध्ये अर्थरने बाजी मारली. त्यानंतर मुनारने पुढील दोन सेट सहज जिंकून लढतीत जोरदार पुनरागमन केले. मात्र चुरशीच्या पाचव्या व निर्णायक सेटमध्ये अर्थरने बाजी मारत विजयावर शिक्कामोर्तब केले. ही लढत तब्बल 4 तास 25 मिनिटांपर्यंत रंगली.

दुसरीकडे कझाकिस्तानच्या अलेक्झांडर बुबलिकने पाच सेटच्या कडव्या लढतीत नवव्या मानांकित ऑस्ट्रेलियन एलैक्स डि मिनॉरचा 2 तास 52 मिनिटांमध्ये 2-6, 2-6, 6-4, 6-3, 6-2 असा पराभव केला. बुबलिकने पहिले दोन सेट गमाविल्यानंतर जोरदार पुनरागमन करत पुढील तीनही सेट जिंकून विजयावर शिक्कामोर्तब केले.

आणखी एका पाच सेटपर्यंत रंगलेल्या लढतीत पोर्तुगालच्या हेन्रीक रोचाने 19 व्या मानांकित झेक प्रजासत्ताकच्या जॅकुब मेन्सिकचा 2-6, 1-6, 6-4, 6-3, 6-3 असे पराभूत करीत तिसरी फेरी गाठली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;