मन:शांतीसाठी धनंजय मुंडे इगतपुरीत, विपश्यना केंद्रात दाखल झाल्याची चर्चा
बीड येथील संतोष देशमुख हत्या प्रकरणी मंत्रिपद गमावलेले माजी मंत्री धनंजय मुंडे मन:शांतीच्या शोधात आहेत. त्यांना रात्रीची झोप लागत नाही. देशमुख त्यांच्या स्वप्नात येतात. त्यामूळे मन: शांतीसाठी ते नाशिकच्या इगतपुरीतील विपश्यना केंद्रात दाखल झाल्याचा दावा सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून केला आहे.
अंजली दमानिया यांच्या झाल्यानंतर मीडियावाले इगतपुरीतील विपश्यना केंद्रात पोहोचले. मुंडे यांनी तिथे प्रवेश करताना सर्वांत आधी त्यांचे महागडे मोबाईल फोन काढून घेतले गेले. नंतर त्यांच्या अंगावरील सर्व कपडे काढायला सांगून केंद्राचे कपडे त्यांना परिधान करण्यास सांगितले गेले. एखाद्या सत्पुरूषासारख्या त्यांनी सर्व सूचना पाळल्याचे सांगितले जाते.
दहा दिवस धनंजय मुंडे त्या विपश्यना केंद्रात राहणार आहेत. तेथील कडक नियमांचे ते पालन करणार आहेत. केंद्रात प्रवेश करण्यापूर्वी त्यांनी आपल्यासोबत आलेल्या लोकांना माघारी जाण्यास सांगितले अशीही माहिती आहे. प्रवेश करताना त्यांच्याकडून चांगल्या वागणुकीचे हमीपत्रही लिहून घेतले गेले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List