मुंबईत आज समुद्राला येणार भरती; 4.88 मीटर उंचीच्या लाटा उसळणार
सोमवारी पहिल्याच पावसाने मुंबईची दाणादाण उडवून दिल्यानंतर आज दिवसभर पावसाने काहीशी विश्रांती घेतली होती. उद्या बुधवारीही हलका ते काही ठिकाणी गडगडाटासह पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. दरम्यान, आज दुपारी समुद्राला 1.03 मिनिटांनी भरती येणार असून 4.88 मीटर उंचीच्या लाटा उसळणार आहेत. त्यामुळे मुंबईकरांनी चौपाटीवर जाऊ नये, असे आवाहन पालिकेने मुंबईकरांना केले आहे. मुंबईत सोमवारी झालेल्या पहिल्याच मुसळधार पावसाने मुंबईचे जनजीवन विस्कळीत करून टाकले. सकाळी 11 वाजेपर्यंत तुफान पाऊस कोसळला. याचवेळी समुद्राला भरती आल्याने सखल भागात मोठय़ा प्रमाणात पाणी तुंबले. बुधवारीही दुपारी समुद्राला येणाऱ्या भरतीवेळी 4.88 मीटर उंचीच्या लाटा उसळणार आहेत. त्यामुळे मुंबईकरांनी दुपारी चौपाटीवर जाणे टाळावे, असे आवाहन पालिकेने केले आहे. दरम्यान, पुढील 24 तासांत मुंबई शहर व उपनगरांत आकाश ढगाळ राहणार असून विजांच्या कडकडाटासह सोसाटय़ाच्या वाऱ्यासह मध्यम आणि जोरदार पावसाच्या सरी पडण्याचा अंदाज कुलाबा वेधशाळेने वर्तवला आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List