Youtube व्हिडीओ पाहून शाळकरी मुलगा निघाला सोलो ट्रीपला; पालकांनी घेतली पोलिसात धाव

Youtube व्हिडीओ पाहून शाळकरी मुलगा निघाला सोलो ट्रीपला; पालकांनी घेतली पोलिसात धाव

गेल्या काही वर्षांपासून लहान मुलं ते अगदी वयोवृद्धांपर्यत सगळ्यांमध्येच सोशल मीडियाची क्रेझ वाढली आहे. कारण इन्स्टाग्राम, फेसबुकसह, युट्युबवर फुड व्लॉगिंग,ट्रॅव्हल व्लॉगिंग सारखे अनेक प्रकारचे कंटेन्ट पाहालया मिळतात. मात्र यामुळे लहान मुलांवर परिणाम होताना दिसत आहे. याचाच एक प्रत्यय केरळमध्ये पाहायला मिळाला. येथे एका 14 वर्षाच्या मुलाने युट्युब रील बघून सोलो ट्रीपचा प्लॅन केला. मात्र पोलिसांनी त्याला सुखरूप शोधून काढले.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना केरळच्या एर्नाकुलम जिल्ह्यातील कोचीमध्ये घडली. एक 14 वर्षांचा मुलगा कोचीतील एका शाळेतून एकटाच निघाला आणि इडुक्की जिल्ह्यातील थोदुपुझामध्ये पोहोचला. दरम्यान मुलगा बेपत्ता झाल्याचे समजताच त्यांच्या पालकांनी पोलिसात तक्रार दाखल केलीय. यानंतर पोलिसांनी शोधमोहिम सुरू केली. तेव्हा दुसऱ्या दिवशी हा मुलगा इडुक्की जिल्ह्यातील थोदुपुझा या उच्चभ्रू शहरात सुखरूप आढळून आला. या मुलाने यूट्यूब रील्सवर प्रेरित होऊन शहर एक्सप्लोर करण्यासाठी एकटाच प्रवास केला, अशी माहिती पोलिसांनी दिली.

मंगळवारी एलामक्कारा पोलीस स्टेशन हद्दीतील एका शाळेतून बेपत्ता झालेला हा मुलगा थोदुपुझामध्ये एका स्थानिक माणसाच्या घरी सापडला. शशिकुमार असे त्या माणसाने नाव आहे. आता शशिकुमारच्या घरातून या मुलाला ताब्यात घेण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. यानंतर पोलिसांनी मुलाची सखोल चौकशी केली. चौकशीदरम्यान, त्या मुलाने सांगितले की त्याला थोदुपुझा पहायचे होते. कारण त्याने त्या ठिकाणाबद्दल अनेक YouTube रील्स पाहिल्या होत्या. कारण तेथील एका YouTuber चा चाहता आहे, अशी प्राथमिक माहिती मिळाली आहे,

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगा हा केरळवरून बसने थोदुपुझामध्ये पोहोचला होता.आणि शशिकुमार त्याला त्याच्या घरी घेउन गेला. यावेळी मुलाने त्याला पोलिसांना कोणतीही माहिती न देण्याचे सांगितले. त्यामुळे मी कोणालाही सांगितले नाही, असा जबाब शशिकुमारने पोलिसांना दिला.

दरम्यान आता पोलीस यासंबंधी माहिती गोळा करत आहेत. या घटनेबाबत अद्याप थोदुपुझा पोलिस ठाण्यात कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही. मुलाच्या कुटुंबाने दाखल केलेल्या तक्रारीनंतर एलामक्कारा पोलिसांनी मंगळवारी बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली होती. मुलाच्या सविस्तर जबाबानंतर त्या व्यक्तीविरुद्ध पुढील कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;