आईच्या प्रियकराचा खून करून मृतदेह घरामागे पुरला, मोहोळमधील घटना; मुलाला अटक
आईसोबत असलेल्या अनैतिक संबंधाचा राग मनात धरून मुलाने आईच्या प्रियकराचा खून करून पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने मृतदेह घरामागे पुरल्याची खळबळजनक घटना मोहोळ तालुक्यातील सौंदणे गावात उघडकीस आली.
नेताजी तुकाराम नामदे (वय – 32) असे खून झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी विकास मारुती गुरव याला अटक करण्यात आली असून, न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली. मयत नेताजी याचे गावातील विकास गुरव याच्या आईबरोबर अनैतिक संबंध असल्याची चर्चा होती. त्यामुळे विकास हा नेताजीवर चिडून होता. या पाश्र्वभूमीवर मयत नेताजी हा 24 मे रोजी सायंकाळी गिरणीतून दळण आणतो म्हणून गेला; तो परत आलाच नाही.
घरच्यांनी त्याची शोधाशोध केली. मात्र, तो आढळला नाही. दरम्यानच्या काळात नेताजीच्या मोबाईलवर विकासचा व्हॉट्सअॅप मेसेज आला. विकासच्या मोबाईलवर संपर्क साधला असता, त्याचा मोबाईल बंद लागला. त्यानंतर नेताजीचा गावात शोध घेतला असता, तो विकास गुरवच्या आला होता, असे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले. त्यामुळे नेताजीचे वडील तुकाराम नामदे यांनी विकासविरोधात मोहोळ पोलिसांत तक्रार दाखल केली होती.
पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तपास केला. यामध्ये विकास गुरव याने नेताजीचा खून करून पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने मृतदेह आपल्याच घरामागील शेतात पुरल्याचे उघडकीस आले आहे. विकास याने खुनाची कबुली दिली आहे. त्याला न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List