रोहित शर्मानं ‘वजन’ वापरलं अन् चक्र फिरली; BCCI नं यू टर्न घेत महिन्याभरापूर्वी हटवलेल्या कोचला परत बोलावलं
इंडियन प्रीमियर लीगचा 18 वा हंगाम संपल्यानंतर हिंदुस्थानचा संघ इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात दोन्ही उभय संघांमध्ये पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळली जाईल. या मालिकेपूर्वी मोठ्या घडामोडी घडल्या. आधी रोहित शर्मा आणि नंतर विराट कोहली याने कसोटीतून निवृत्ती घेतली. अर्थात रोहितने कसोटीतून निवृत्ती घेतली असली तरी आजही त्याच्या शब्दाला बीसीसीआयमध्ये मान असल्याचे समोर आले आहे. कारण रोहितच्याच विनंतीवरून महिन्याभरापूर्वी नोकरीवरून काढून टाकण्यात आलेल्या क्षेत्ररक्षक प्रशिक्षकाची पुन्हा नियुक्ती करण्यात आली आहे. ‘एनडीटीव्ही’ने बीसीसीआयमधील सूत्रांच्या हवाल्याने याबाबत वृत्त दिले आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List