अवकाळीचा फटका, भाजीपाला कुजला; एपीएमसीत दहा ट्रक माल कचऱ्यात, टोमॅटो, कोबी, फरसबी उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

अवकाळीचा फटका, भाजीपाला कुजला; एपीएमसीत दहा ट्रक माल कचऱ्यात, टोमॅटो, कोबी, फरसबी उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

मे महिन्याच्या सुरुवातीपासून राज्यात धुमाकूळ घातलेल्या अवकाळी पावसाचा नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटला मोठा फटका बसला आहे. पावसामुळे मार्केटमध्ये सुमारे ६० टक्के भाजीपाला कुजलेल्या अवस्थेत येत आहे. त्यामुळे कवडीमोल दरातही या भाज्यांना उठाव नाही. भाजी मार्केटमधील दहा ट्रक माल आज व्यापाऱ्यांना कचऱ्यात फेकावा लागला त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. अवकाळी पावसामुळे टोमॅटो, कोबी आणि फरसबी उत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक गणित पूर्णपणे बिघडले आहे. आले, फ्लॉवर आणि वाटाण्याच्या दरात मात्र आठवडाभरात दुपटीने वाढ झाली आहे.

सध्या मार्केटमध्ये ग्राहक कमी आहेत. मालाला पाहिजे तेवढा उठाव नाही. त्यामुळे मालाची मोठी पडल्यामुळे त्याचा मोठा परिणाम भाजीपाल्यावर झाला आहे. या पावसाचा सर्वाधिक फटका टोमॅटो, कोबी, फरसबी या पिकांसह अन्य पिकांना बसला आहे. मे महिन्यात वातावरण उष्ण असते. या उष्ण वातावरणात अचानक पाऊस पडल्यामुळे भाजीपाला खराब होण्याचे प्रमाण वाढले आहे. रखडपट्टी होत आहे. भिजलेला भाजीपाला जास्त काळ तग धरत नसल्याने तो खराब होत आहे. नाइलाजास्तव हा भाजीपाला कचऱ्यात फेकावा लागत आहे. आज मार्केटमध्ये सुमारे दहा ट्रक भाजीपाला कचऱ्यात फेकावा लागला. त्याचा मोठा फटका शेतकरी आणि व्यापाऱ्यांना बसला आहे.

अवकाळी पावसाने संपूर्ण राज्यात सध्या मोठा धुमाकूळ घातला आहे. उन्हाळ्यात पाऊस पडल्यामुळे त्याचा मोठा परिणाम भाजीपाल्यावर झाला आहे. या पावसाचा सर्वाधिक फटका टोमॅटो, कोबी, फरसबी या पिकांसह अन्य पिकांना बसला आहे. मे महिन्यात वातावरण उष्ण असते. या उष्ण वातावरणात अचानक पाऊस पडल्यामुळे भाजीपाला खराब होण्याचे प्रमाण वाढले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;