34 वर्षांच्या आयुष्यात मारहाणीपासून वेश्याव्यवसायापर्यंत, मृत्यूंनंतर अभिनेत्रीच्या नशिबात नव्हते चार खांदे

34 वर्षांच्या आयुष्यात मारहाणीपासून वेश्याव्यवसायापर्यंत, मृत्यूंनंतर अभिनेत्रीच्या नशिबात नव्हते चार खांदे

Actress Life: बॉलिवूड विश्वातील सेलिब्रिटींचं आयुष्य बाहेरून जेवढं आकर्षक वाटतं, तेवढंच खडतर देखील असतं. कोणती मोठी घटना घडल्यानंतर बॉलिवूडचा काळा चेहरा जगासमोर येतो आणि सर्वत्र खळबळ माजते. असंच काही एका प्रसिद्ध अभिनेत्री दिग्गज अभिनेत्रीसोबत झालं आहे. कमी वयात अभिनेत्रीने हिंदी सिनेविश्वात फार मोठा टप्पा गाठला. पण अभिनेत्रीला आयुष्या सुख भोगता आलं नाही. आर्थिक अडचणी आल्यानंतर पतीने साथ सोडली. त्यानंतर अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने इतर श्रीमंत पुरुषांकडे तिची बोली लावली. 34 वर्षांच्या आयुष्यात अभिनेत्रीने असंख्या यातना भोगल्या. एवढंच नाही तर, मृत्यूनंतर अभिनेत्रीच्या नशिबात चार खांदे देखील नव्हते.

सध्या ज्या अभिनेत्रीची चर्चा रंगली आहे ती अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून अभिनेत्री विमी आहे. जिने शशि कपूर, सुनील दत्त, राज कपूर यांसारख्या दिग्गज सेलिब्रिटींसोबत स्क्रिन शेअर केली. 1943 मध्ये जन्मलेल्या विमीचं लग्न कमी वयात फार मोठ्या उद्योजकासोबत झालं होतं. लग्नानंतर अभिनेत्रीने दोन मुलांना देखील जन्म दिला.

विमी एका नवऱ्यासोबत एका पार्टीसाठी गेली होती. तेव्हा अभिनेत्रीची ओळख दिग्दर्शत रवी यांच्यासोबत झाली. त्यानंतर विमी हिच्या फिल्मी करीयरला सुरुवात झाली. बीआर चोप्रा यांच्या ‘हमराज’ सिनेमातून अभिनेत्री बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. विमी सिनेमात काम करत असल्यामुळे साररचे कुटुंबिय नाराज होते. पण नवऱ्याने अभिनेत्रीची साथ सोडली नाही.

याचाच राग येऊन विमीच्या सासरच्या लोकांनी तिला आणि तिच्या पतीला मालमत्तेतून बाहेर काढले. पण, विमीची कारकीर्द चांगली चालली होती आणि तिच्या घराबाहेर दिग्दर्शक आणि निर्मात्यांची रांग लागली होती. त्या काळात ती एका सिनेमासाठी 3 लाख रुपये घेत होती.

विमीचा नवरा तिच्यासाठी सेक्रेटरीचा काम करत होता. हळू – हळू अभिनेत्रीचा नवरा तिच्या सिनेमांमध्ये हस्तक्षेप करू लागला. ज्यामुळे विमीच्या अनेक सिनेमांचे करार तुटले. यानंतर त्यांचे वाईट दिवस सुरू झाले. जेव्हा तिचे सिनेमे फ्लॉप होऊ लागले तेव्हा दिग्दर्शक आणि निर्माते देखील मागे हटले.
सिनेमांमध्ये अपयश आल्यानंतर, विमीला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला आणि तिचा नवरा दारूच्या नशेत तिला मारहाण करू लागला. तिचे तिच्या पतीसोबतचे संबंध बिघडले आणि ती निर्माती जॉलीच्या प्रेमात पडली आणि ते एकत्र राहू लागले.

नवऱ्याने सोडल्यानंतर बॉयफ्रेंड जॉली याने देखील अभिनेत्रीची फसवणूक केली. काम देण्याच्या बहाण्याने जॉलीने अभिनेत्रीला इतर निर्मात्यांसोबत तडजोड करण्यास सांगत होता. विमीच्या जवळच्या व्यक्तींनी दिलेल्या माहितीनुसार, विमीने वेश्या व्यवसाय करण्यास सुरुवात केली होती.

1977 मध्ये विमी हिने वयाच्या 34 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. दारूचे व्यसनामुळे अभिनेत्रीचं निधन झालं… असं देखील सांगण्यात आलं. रुग्णालयात अभिनेत्रीने अखेरचा श्वास घेतला. पण शेवटच्या क्षणी अभिनेत्रीसोबत कोणीच नव्हतं. अभिनेत्रीची अवस्था इतकी वाईट होती की तिचा मृतदेह हातगाडीतून स्मशानभूमीत नेण्यात आला.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Kokan News – प्लास्टिक कचरा गोळा करणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळणार बक्षीस; सृजन सायन्स सेंटरचा अभिनव उपक्रम Kokan News – प्लास्टिक कचरा गोळा करणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळणार बक्षीस; सृजन सायन्स सेंटरचा अभिनव उपक्रम
देवरुख शहरातील सृजन सायन्स अँड इनोव्हेशन ऍक्टिव्हिटी सेंटरतर्फे कचरा निर्मूलन मोहीम स्पर्धा विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आली आहे. यामध्ये विद्यार्थ्यांनी जास्तीत...
परतीच्या पावसाने कापलेली भात शेती पुन्हा रुजली, ऑक्टोबर महिना संपला तरीही पाऊस सुरूच
Kokan News – देवरुख येथील सृजन विज्ञान केंद्रात आली अवकाश शास्त्राची नवीन मॉडेल्स
किशोरवयीन मुलांना AI ची भुरळ, वैद्यकीय माहिती आणि रोमान्ससाठी AI चा अधिक वापर!
सरकारकडून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ, 5 रुपयांची दिली मदत; विजय वडेट्टीवार यांच्याकडून संताप व्यक्त
…असा असेल सत्याचा मोर्चा; सर्वपक्षीय बैठकीनंतर अनिल परब यांनी दिली माहिती
तुम्ही पण फ्रिजमध्ये ठेवलेला शिळा भात पुन्हा गरम करून खाता का? मग हे वाचाच; जाणून आश्चर्य वाटेल