…तर हगवणेच्या वकिलाची सनद रद्द झाली पाहिजे, वैष्णवीची बदनामी करायला सुरुवात केल्यानं अंजली दमानियांचा संताप

…तर हगवणेच्या वकिलाची सनद रद्द झाली पाहिजे, वैष्णवीची बदनामी करायला सुरुवात केल्यानं अंजली दमानियांचा संताप

दोन कोटी रुपयांच्या हुंडय़ासाठी मानसिक आणि शारिरीक छळ केल्यामुळे वैष्णवी हगवणे या विवाहितेने आत्महत्या केली. हुंडाबळीच्या या घटनेने राज्यभरात संतापाची लाट उसळली. या प्रकरणाने संपूर्ण राज्याला हादरवून सोडले असताना हगवणे कुटुंबाच्या बाजूने उभे राहणारे वकील विपुल दुशिंग यांनी न्यायालयात धक्कादायक दावे केले. दुशिंग यांनी वैष्णवीची बदनामी सुरु केल्याने त्यांच्यावर चौफेर टीका सुरू झाली. आता या प्रकरणात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनीही उडी घेत अॅड. विपुल दुशिंग यांच्यावर तीव्र शब्दांमध्ये हल्ला चढवला आहे.

हगवणे कुटुंबाचे वकील विपुल दुशिंग यांनी काल कोर्टात जे मांडले ते ऐकून खूप राग आला आहे. विपुल दुशिंग घरगुती हिंसाचाराचे समर्थन करतात का? असा सवाल अंजली दमानिया यांनी केला.

प्लास्टिकच्या छडीने मारहाण केली, तर प्लास्टिकची छडी हत्यार आहे का? असे ते कोर्टात म्हणाले. वैष्णवीची बदनामी त्यांनी करायला सुरुवात केली. नवऱ्याने बायकोच्या कानाखाली मारणे हा छळ आहे का? असे ते कोर्टात बोलले. असे विचारणाऱ्या या विद्वान वकिलांना घरगुती हिंसाचाराचे नियम माहीत आहेत का? असा सवालही दमानिया यांनी केला.

कायद्याच्या कलम 3 मध्ये घरगुती हिंसाचाराची व्याख्या व्यापक पद्धतीने केली आहे. ज्यामध्ये हे समाविष्ट आहे, शारीरिक, मानसिक, शाब्दिक, भावनिक, लैंगिक आणि आर्थिक अत्याचार – हुंड्यासाठी छळ, – पीडितेला किंवा तिच्याशी संबंधित इतर कोणत्याही व्यक्तीला अत्याचार करण्याची धमकी देण्याचे कृत्य. घरगुती हिंसाचाराचे समर्थन जर हे वकील विपुल दुशिंग करत असतील तर अशा वकिलाची सनद रद्द झाली पाहिजे. पुणे बार असोसिएशनला हात जोडून विनंती की या माणसाची सनद रद्द झाली पाहिजे, अशी मागणीही दमानिया यांनी केली.

Vaishnavi Hagawane Case – वकिलालाच कोर्टात खेचण्याची वेळ आलीये! हगवणेंच्या वकिलाने केलेल्या अजब युक्तीवादावर अभिनेता भडकला

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;