Gold price – सोनं स्वस्त झालं; प्रतितोळा भाव 5500 रुपयांनी घसरला, आजचा दर किती?
गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या हिंदुस्थान-पाकिस्तानमधील तणाव तुर्तास निवाळला आहे. तर अमेरिकेने चीनवर लावलेल्या टॅरिफबाबत संयामाची भूमिका घेतली आहे. रशिया आणि युक्रेनमधील चर्चेची द्वारेही पुन्हा उघडण्याची शक्यता आहे. जागतिक स्तरावर एका मागोमाग होणाऱ्या या सकारात्मक घडामोडीमुळे गुंतवणूकदारांनी सोन्यातील गुंतवणूक कमी करून पुन्हा आपला मोर्चा शेअर मार्केटकडे वळवला आहे. यामुळे मार्केटमध्ये तेजी आली असून सोन्याची झळाळी मात्र उतरली आहे.
सोन्याच्या किंमतीमध्ये पुन्हा एकदा घसरून दिसून येत आहे. सोन्याचा दर विक्रमी उंच्चांकावरून 5500 रुपयांनी कमी झाला आहे. बुधवारी प्रति 10 ग्रॅम अर्थात एक तोळ्यासाठी 96,593 रुपये मोजावे लागत होते. तर 22 एप्रिल 2025 रोजी हाच दर 1 लाख 2 हजार 73 पर्यंत पोहोचला होता. मात्र आता जवळपास 22 दिवसांमध्ये यात 5500 रुपयांची घसरण झाली आहे.
हिंदुस्थान-पाकिस्तानमधील युद्ध टळल्याने आणि अमेरिका-चीनमधील टॅरिफ वॉर थंडावल्याने सोन्याच्या किंमतीत घट झाल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. अमेरिका आणि चीनने एकमेकांवर लावलेल्या अतिरिक्त शुल्कास 90 दिवसांची स्थगिती दिली आहे. त्यामुळे जागतिक बाजाराने उसळी घेतली. तसेच हिंदुस्थानच्या बाजारातही तेजी दिसून आली. तसेच डॉलर मजबूत होत गेला आणि सोन्याच्या दरात घसरण झाली.
सेन्सेक्स-निफ्टीमध्ये तेजी
मंगळवारी शेअर बाजारात 1281 अंकांची घसरण झाली होती, मात्र बुधवारी मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स आणि राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये तेजी दिसून आली. सुरुवातीलाच सेन्सेक्स 175 अंक, तर निफ्टी 51 अंकांनी वधारला. त्यानंतर बाजारात उत्साह दिसून आला आणि सेक्सेक्ससह निफ्टीतही मोठी वाढ झाली.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List