लिफ्टमध्ये शेजाऱ्याला कुत्रा चावला; मालकाला सात वर्षांनंतर तुरुंगवास दंडाधिकाऱ्यांनी ठोठावला चार हजारांचा दंड

लिफ्टमध्ये शेजाऱ्याला कुत्रा चावला;  मालकाला सात वर्षांनंतर तुरुंगवास  दंडाधिकाऱ्यांनी ठोठावला चार हजारांचा दंड

लिफ्टमध्ये शेजाऱ्याला कुत्रा चावल्याप्रकरणी पुत्र्याच्या मालकाला येथील दंडाधिकारी न्यायालयाने दणका दिला आहे. ऋषभ पटेल असे त्या पुत्र्याच्या मालकाचे नाव असून याप्रकरणी दंडाधिकाऱ्यांनी त्याला दोषी ठरवत चार महिन्यांच्या सश्रम तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली. तब्बल सात वर्षांनी या खटल्याचा निकाल लागला असून भरपाई म्हणून चार हजार रुपये पटेल याने तक्रारदाराला सुपूर्द करण्याचे आदेश दंडाधिकाऱ्यांनी दिले आहेत.

वरळी येथील तक्रारदार रमिक शाह त्यांच्या दीड वर्षाच्या मुलासह आणि नोकरासह लिफ्टमधून खाली जात असताना ऋषभ पटेल यांनी त्यांच्या पुत्र्यासह आत जाण्याचा प्रयत्न केला. लहान मुलगा कुत्र्याला घाबरत असल्याने शाह यांनी पटेल यांना बाहेर थांबण्याची विनंती केली, परंतु पटेल यांनी त्याकडे लक्ष दिले नाही. दरम्यान कुत्र्याने लिफ्टमध्ये शाह यांच्या डाव्या हाताला चावा घेतला. त्यानंतर शाह यांनी वरळी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

न्यायालय काय म्हणाले

आरोपीला माहिती शहा यांची व त्यांच्या मुलाची पर्वा नव्हती. मुळात लिफ्ट मानवी वापरासाठी असतानाही आरोपीने स्वतःच्या पाळीव प्राण्याला लिफ्टमधून नेले. त्यामुळे पटेल सूट मिळण्यास पात्र नसल्याचे नमूद करत दंडाधिकारी सुहास भोसले यांनी आरोपी पटेल याला चार महिन्यांच्या सक्तमजुरीची शिक्षा सुनावली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;