पृथ्वीचे तापमान 5 वर्षांत 1.5 अंशाने वाढणार, जागतिक हवामान संघटनेचा इशारा

पृथ्वीचे तापमान 5 वर्षांत 1.5 अंशाने वाढणार, जागतिक हवामान संघटनेचा इशारा

पुढील पाच वर्षांत जागतिक तापमान सरासरी 1.5 अंश सेल्सियसने वाढण्याची शक्यता जागतिक हवामान संघटनेने (डब्ल्यूएमओ) वर्तवली आहे. जागतिक हवामान संघटनेने दिलेल्या अहवालानुसार, 2025-29 या कालावधीत सरासरी जागतिक तापमान औद्योगिकीकरणापूर्वीच्या पातळीपेक्षा 1.5 अंश सेल्सियसपेक्षा जास्त होण्याची शक्यता 70 टक्के आहे. पुढील पाच वर्षांपैकी एक वर्ष सर्वाधिक उष्णतेचे असण्याची शक्यता वर्तवण्यात आलीय. उष्णतेच्या बाबतीत 2024 या वर्षाचा रेकॉर्ड येत्या पाच वर्षांत मोडला जाण्याची शक्यता आहे.

2024 हे सर्वाधिक उष्ण वर्ष ठरले. यात 1850-1900 च्या बेसलाईनपेक्षा 1.5 सेल्सियसपेक्षा जास्त जागतिक सरासरी तापमान होते. हवामान बदलाचे दुष्परिणाम टाळण्यासाठी 2015 मध्ये पॅरिस हवामान परिषदेत सहभागी राष्ट्रांनी 1.5 अंश सेल्सियस तापमान मर्यादा निश्चित केली होती. पॅरिस करारात नमूद केलेल्या 1.5 अंश सेल्सियस तापमान मर्यादेचे कायमचे उल्लंघन म्हणजे मागील 20-30 वर्षांतील दीर्घकालीन तापमानवाढ होय. सुमारे 100 ते 150 वर्षांपूर्वीपर्यंत अनेक शतके पृथ्वीचे सरासरी तापमान फारसे वाढले नव्हते. औद्योगिक क्रांतीनंतर या परिस्थितीत वेगाने बदल होत गेला. पर्यावरणातील मानवी हस्तक्षेप, प्रदूषण, जंगलतोड, हरितगृह वायूंचे उत्सर्जन आदी कारणांमुळे गेल्या काही वर्षांत पृथ्वीचे सरासरी तापमान बरेच वाढले आहे. 1850 ते 1900 या वर्षांमध्ये जागतिक सरासरी तापमानवाढ अर्धा अंश सेल्सियसपेक्षा कमी होती. 1980 ते 2000 या काळात दरवर्षी पृथ्वीचे सरासरी तापमान साधारण एक अंश सेल्सियसने वाढत गेले. त्यानंतर हा वेग दीड अंश सेल्सियसपर्यंत वाढू लागला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;