घातक रसायनांची बेकायदा वाहतूक, बोईसर पोलीस ठाण्यात टँकरचालकासह तिघांवर गुन्हा

घातक रसायनांची बेकायदा वाहतूक, बोईसर पोलीस ठाण्यात टँकरचालकासह तिघांवर गुन्हा

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची कोणतीही परवानगी न घेता घातक रसायनाची बेकायदा वाहतूक केल्याप्रकरणी बोईसर पोलिसांनी टँकरचालकासह तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. तारापूर औद्योगिक क्षेत्रात हा टँकर रसायनाची बेकायदा वाहतूक करत असताना पोलिसांनी पकडला होता. त्यानंतर टँकरमधील रसायनाचे नमुने प्रयोगशाळेत पाठवण्यात आले असता रसायन घातक असल्याचे उघडकीस आले होते.

तारापूर औद्योगिक वसाहतीमधील एका कारखान्यातून घातक रसायनाने भरलेला संशयास्पद टँकर (एम.एच.04, डी. एस.9628) रसायनाची बेकायदा विल्हेवाट लावण्यासाठी पाम गावाकडे जात असताना गोगटे नाका येथे बोईसर पोलिसांनी ताब्यात घेतला. पोलिसांनी टँकरमधील रसायनासंबंधित कागदपत्रांची मागणी केली असता चालकाकडे आवश्यक कागदपत्रे आढळून आली नव्हती. याप्रकरणी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांना माहिती दिल्यानंतर क्षेत्र अधिकारी यांनी टँकरमधील रसायनाचे नमुने ताब्यात घेऊन तपासणीसाठी ठाणे येथील प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या प्रयोगशाळेत पाठवले होते. रसायनाची वाहतूक करणारा टँकर हा अष्टविनायक एण्टरप्राइजेस या कंपनीचा आहे.

प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नियमांचा भंग
प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अटी-शर्तीनुसार टँकरमधून घातक रसायनाची वाहतूक करण्याआधी टँकर मालकाने मॅनीफेस्ट (फॉर्म 10) च्या ऑनलाइन प्रती सादर केल्या नव्हत्या. त्याचप्रमाणे टँकरमधील रसायनाचे नमुने प्रयोगशाळेत तपासले असता हे रसायन घातक असल्याचे उघडकीस आले. घातक रसायनाची विनापरवाना वाहतूक केल्याप्रकरणी टँकरचालक शिवम दुबे, विवेक वडे आणि नील राऊळ यांच्याविरोधात बोईसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास हा सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश अस्वार करीत आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;